आव्हाडांनी मंत्रीपदाची शपथ घेताच राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:40 IST2019-12-31T00:40:27+5:302019-12-31T00:40:36+5:30
ढोलताशे वाजवत, फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा

आव्हाडांनी मंत्रीपदाची शपथ घेताच राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जोरदार जल्लोष केला. ढोलताशे वाजवत, फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
आ. आव्हाड यांचे नाव मंत्रीपदासाठी निश्चित झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या ठाणे कार्यालयामध्ये मोठा स्क्रीन लावून शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सोमवारी दुपारी १ वाजून ४१ मिनिटांनी शपथविधीसाठी आव्हाड यांचे नाव पुकारताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करीत फटाके फोडले. तसेच, आव्हाड यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ पूर्ण केल्यानंतर कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवत, फुगड्या घालत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत, संदीप जाधव, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, युवक अध्यक्ष मोहसीन शेख, युवती अध्यक्षा प्रियंका सोनार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंब्रा येथे केले लाडूंचे वाटप
मुंब्रा : मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मंत्री झाल्याचे कळताच शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्यांनी एकमेकांची भेट घेऊन आनंद साजरा केला. समाजमाध्यमांवरही आव्हाड यांच्या अभिनंदनाचे मेसेज व्हायरल झाले. तर, नगरसेवक जफर नोमाणी यांनी येथील अमृतनगर भागातील शादीमहल रोड परिसरात फटाके फोडून लाडूंचे वाटप केले.