शिवसेनेसारख्या दलालाकडे कशाला सत्ता देता ?,  मुख्यमंत्र्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:10 IST2017-08-18T05:10:04+5:302017-08-18T05:10:08+5:30

उद्या जर तुम्ही भाजपाऐवजी शिवसेनेच्या हाती सत्ता दिलीत, तरी शेवटी कामांसाठी त्यांना माझ्याकडेच येऊन याचना करावी लागणार आहे

What power does the party have with Shiv Sena ?, the question of chief minister | शिवसेनेसारख्या दलालाकडे कशाला सत्ता देता ?,  मुख्यमंत्र्यांचा सवाल

शिवसेनेसारख्या दलालाकडे कशाला सत्ता देता ?,  मुख्यमंत्र्यांचा सवाल

मीरा रोड : देशात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. उद्या जर तुम्ही भाजपाऐवजी शिवसेनेच्या हाती सत्ता दिलीत, तरी शेवटी कामांसाठी त्यांना माझ्याकडेच येऊन याचना करावी लागणार आहे. म्हणून मधले दलाल हवे कशाला, अशी घणाघाती टीका शिवसेनेचा नामोल्लेख टाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा- भार्इंदरमधील प्रचार सभेत केली.
मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रारसभेत ते बोलत होते. काही जण विनाकारण मोठे दावे करतात. आम्ही हे करु, ते करु. पण कसे करणार? त्यांना पैशांसाठी, अंतिम मंजुरीसाठी माझ्याकडेच यावे लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दाव्याची खिल्ली उडवली.
भाजपाच्या हातात एकहाती सत्ता द्या. भाजपाचे महापौर, आमदार माझ्याकडे विकासकामांच्या पैशासाठी येतील तेव्हा ते भार्इंदरला माघारी पोचेपर्यंत पैसे मंजूर झालेले असतील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शांतीपार्क व जेसल पार्क येथे दोन जाहीर सभा घेतल्या.

Web Title: What power does the party have with Shiv Sena ?, the question of chief minister