शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय, संतप्त पोलिसांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 15:58 IST

राज्यात 144 कलम लागू असतांना शहरात अनेक ठिकाणी याचे उल्लघंन होतांना दिसत होते. त्यामुळे ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय? असा संतप्त सवाल पोलिसांना करावा लागत होता.

ठाणे   - रविवारचा जनता कर्फ्यूला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर सोमवारी मात्र शहरातील अनेक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. काहीना काही खोटी कारणे सांगून नागरीक पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले होते. राज्यात 144 कलम लागू असतांना शहरात अनेक ठिकाणी याचे उल्लघंन होतांना दिसत होते. त्यामुळे ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय? असा संतप्त सवाल पोलिसांना करावा लागत होता. दुसरीकडे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकान, स्टॉल हॉटेल, बार रेस्टॉरन्ट बंद असल्याचे दिसून आले. परंतु घरातून बाहेर पडलेल्या वाहन चालकांना ठाण्याच्या हद्दीवर रोखले जात होते आणि परत घरी पाठविले जात होते.रविवारी जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद दिला. मात्र सोमवारी याच्या उलट चित्र शहराच्या अनेक भागात दिसून आले सकाळी आनंदनगर टोलनाका या टोलनाक्यावर गाड्यांची रांगा लागल्या होत्या मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेशी निगिडत जाणाऱ्या गाडय़ांना फक्त मुंबई दिशेने रवाना करण्यात आल्या तर बाकीच्या गाड्या पुन्हा ठाण्याला रवाना केल्या जात होत्या. असेच चित्र ठाणो इस्टर्न इम्प्रेस हायवे दिसत होते. ठाण्यातून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या गाड्या अडवण्यात आल्या,यावेळी काही लोकांनी पोलिसांना सोबत हुज्जत ही घातला, काहींनी मी सायन्टिस्ट असल्याचे सांगितले, तर काही जण महत्वाचे काम असल्याचे सांगत होते. तर काही नागरिक केवळ मोकळा रस्ता असल्याने बाहेर पडल्याचे सांगत होते. या सर्वाना सुरवातीला पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांनाही काहींना त्यांच्याच भाषेत समजावण्याची वेळ आल्याचे दिसून आले.करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळावा या साठी रेल्वेची सेवा बंद झाली आहे. तसेच शहरातील टीएमटीची सेवा देखील ठराविक काळासाठीच सुरू होती, ती देखील अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु होती. त्यामुळे नागरिकांना आपल्या खाजगी वाहनाचा वापर करीत ठाण्याच्या विविध नाक्यांवर गर्दी केल्याचे दिसत होते. आनंद नगर टोलनाक्यावर तर अधिकची वाहनांची रांग लागली होती. त्यात नागरिकांना समजावतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे नागरिकानी 144 कलम तोडून मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली असतानाच आनंद शनगर चेक नाका येथे पोलिसांनी नाकाबंदी लावून अनावश्यक गाड्या परत पाठवल्या. दुसरीकडे शहरातील कॅडबरी, नितीन कंपनी, तीनहात नाका, वर्तकनगर, मानपाडा, पातलीपाडा, कासारवडवली, वाघबीळ, कळवा नाका, कोर्ट नाका आदींसह महत्वाच्या नाक्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. तरीसुध्दा नागरीक यातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. तर शहरातील इतर मार्गावर मात्र वाहनांची संख्या कमी असल्याचे चित्र होते.दुसरीकडे शहरातील दुकाने, हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट आदींसह इतर महत्वाची दुकाने,मॉलसुध्दा बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेचीच दुकाने सुरु असल्याचे दिसत होते. परंतु त्याठिकाणी देखील सामान घेण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसत होते. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले असतांनाही अशा पध्दतीने नागरींनी गर्दी केल्याने त्याच्यातून धोका कसा टाळायचा असा सवाल आता उपस्थित झाला आहे. भाजीपाला महागलावाशीतील एपीएमसी मार्केट बंद झाल्याने मार्केटमध्ये भाजीपाला आलेला नाही. जांभळीचे मार्केट देखील रविवारी बंद होते. त्याचा परिणाम सोमवारी दिसून आला. अनेक ठिकाणी असलेल्या तुरळक भाजी विक्रेत्यांनी भाज्या चढय़ा भावाने विकल्याचे दिसून आले.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस