शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पहिल्या दिवशी ग्रंथालयात गुलाब पुष्प देऊन स्वागत; १०,००० पुस्तकांची यादी मोबाइलवर मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:47 PM

Coronavlrus, Lockdown News: वाचकांना व सभासदांना घरबसल्या पुस्तकाची यादी दिसावी अशी सोय आता मराठी ग्रंथ संग्रहालयाने केली आहे

ठाणे : कोरोनामुळे सुमारे आठ महिने बंद असलेले ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय आज पासून पूर्ववत सुरु झाले आहे. आज पहिल्या दिवशी येणाऱ्या सभासदांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ठाण्याचे गौरव असलेले, व १२७ वर्षे जुने असलेले मराठी ग्रंथ संग्रहालय आता पूर्ववत सुरु झाले. संस्थेची मुख्य शाखा व नौपाडा शाखा या दोन्ही ठिकाणी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत पुस्तक देवघेव सुरु झाली आहे. 

वाचकांना व सभासदांना घरबसल्या पुस्तकाची यादी दिसावी अशी सोय आता मराठी ग्रंथ संग्रहालयाने केली आहे. ग्रंथालयातील  सुमारे १०००० (दहा हजार ) नव्या पुस्तकांची यादी PDF  स्वरुपात मोबाइलवर किंवा मेल वर सर्वाना पाहता येईल. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी दिली. सभासदांसाठी एक विशेष सवलत योजना संस्थेने जाहीर केली आहे. आतापासून जे सभासद बारा महिन्यांची वर्गणी भरतील त्यांना चौदा महिन्यांसाठी म्हणजे डिसेंबर २०२१ पर्यंत सभासदत्व मिळेल. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.  पुढील आठवड्यात दिवाळी अंकाच्या विशेष योजनेची नोंदणी सुरु केली जाईल. 

संस्थेची अभ्यासिकाही मर्यादित संख्येत लवकरच सुरु करत असून त्यासाठी नियमांचे कठोर पालन केले जाईल. त्यासाठी विद्यार्थांनी आपली नोंदणी करावी. तसेच संस्थेचे सभागृह देखील मर्यादित संख्येसाठी लवकरच उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :libraryवाचनालयcorona virusकोरोना वायरस बातम्या