टिटवाळ्यात पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:43 AM2019-07-31T00:43:03+5:302019-07-31T00:43:44+5:30

चार दिवसांपासून नागरिकांचे हाल : मोहोली उदंचन केंद्रातील यंत्रणा अद्याप नादुरुस्त

Weeding for water in Titwala | टिटवाळ्यात पाण्यासाठी वणवण

टिटवाळ्यात पाण्यासाठी वणवण

googlenewsNext

टिटवाळा : कल्याण तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे केडीएमसीचे मोहिली उदंचन केंद्र पाणीखाली गेले होते. त्यामुळे या केंद्रांतून तसेच मोहने सबपंप हाउसमधून कल्याण-डोंबिवली शहरांना दोन दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. रविवार सायंकाळनंतर कल्याण-डोंबिवलीचा पुरवठा सुरळीत झाला. मात्र, केडीएमसीतील भाग असलेल्या टिटवाळा शहर आणि परिसराला चार दिवस झाले तरी अजूनही या केंद्रांतून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी येथील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील मोहिली उदंचन केंद्रातून १०० एमएलडी पाणी उचलून व शुद्धीकरण करून मांडा, टिटवाळा, बल्याणी, मोहने, मोहोली, उंभार्णी, गाळेगाव, मोहने, फुलेनगर, वडवली, अटाळी व आंबिवली येथे पुरवले जाते. परंतु, शुक्र वारी झालेल्या पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्र दोन दिवस पाण्याखाली होते. यामुळे तेथील पाणी शुद्ध व पाणीपुरवठा करणारी सर्व यंत्रसामग्री व पंपहाउस नादुरु स्त झाले आहेत. यामुळे चार दिवसांपासून टिटवाळा परिसरातील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिक प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत आहेत. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी चार दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रसामग्री व पंपहाउस दुरु स्त करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. परंतु, त्यांना काही यश येत नाही. एक बिघाड
दुरु स्त केला की दुसरा बिघाड होत असल्याने अक्षरश: कर्मचारी व अधिकारी चार दिवसांपासून हैराण झाले आहेत.
दरम्यान, चार दिवसांपासून आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहोत. केडीएमसी प्रशासनाने पर्यायी व्यवस्थापक म्हणून टँकरद्वारे तरी पिण्याच्या पाणीपुरवठा करायला हवा होता. आम्ही चार दिवसांपासून विकत घेऊन पाणी पित आहोत. काही नागरिक अक्षरश: पावसाचे पाणी गाळ व गरम करून वापरत आहेत, असे टिटवाळा येथील रहिवासी नीलेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

चार दिवसांपासून मी मोहिली येथील उदंचन केंद्रांवर जाऊन पाहणी करत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करून पुराच्या पाण्यामुळे नादुरु स्त झालेली यंत्रसामग्री दुरु स्त करण्याचे काम करत आहेत.
- उपेक्षा भोईर, उपमहापौर

दोन दिवस संपूर्ण पंपहाउस, उदंचन केंद्र व जलशुद्धीकरण केंद पुराच्या पाण्यात होते. यामुळे येथील सर्व मशनरी, पंप हाउस नादुरु स्त झाली आहे. एक बिघाड दुरु स्त केला की दुसरा बिघाड पुढे उभा राहतो. लवकरच आम्ही हा बिघाड दुरुस्त करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
- उदय सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता, ‘अ’ प्रभाग क्षेत्र

Web Title: Weeding for water in Titwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.