शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोरेगावात राहत्या घरात सापडला शस्त्रसाठा, दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 17:11 IST

ठाणे पोलिसांची कारवाई; दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीस अटक 

ठाणे - ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री मुंबईतून गोरेगाव येथील बांगूर नगरमधील घरातून यास्मीन नईम खान (वय ३५) हिला एके ५६, ९५ जिवंत काडतुसे, ९ एमएमच्या २ पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे आणि ३ मॅगझीन या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे. यास्मीन ही महिला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीतील नईम या सदस्याची पत्नी आहे. नईमला मुंबई गुन्हे शाखेने २० एप्रिल २०१६ला अटक केली होती.५ जुलै रोजी ठाण्यातील साकेत रोडवर कुख्यात ड्रग्स तस्करी करणारे येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून जाहिद अली शौकत काश्मिरी (वय ४७) आणि संजय बिपीन श्रॉफ (वय ४७) या नागपाड्यात राहणाऱ्या दोघांना शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत १० ग्रॅम कोकेन आणि १ लाख ५७ हजार २५० रुपये सापडले. त्यांना एनडीपीएस अॅक्टअन्वये अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलिसांच्या चौकशीत जाहिद या आरोपीने कुख्यात गुंड दाऊदचा सदस्य नईम फईम खानच्या बांगूरनगर येथील घरात शस्त्रसाठा असल्याची माहिती दिली होती.त्यानुसार ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने गोरेगाव येथे काल रात्री धाड घालत यास्मीन नईम खानला एके ५६, ९५ जिवंत काडतुसे, ९ एमएमच्या २ पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे आणि ३ मॅगझीन या शस्त्रसाठ्यासह अटक केली. या महिलेचा पती नईम खानला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० एप्रिल २०१६ रोजी भादंवि कलम ३०२, १२० (ब) आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. या गुन्ह्यात इतर ४ आरोपी अटकेत असून कुख्यात गुंड छोटा शकीलने दिलेल्या सुपारीवरून इक्बाल अत्तरवालाला ठार मारण्यासाठी आले असताना नईमला इतर चार साथीदारांसह रंगेहाथ पोलिसांनी पकडले होते. हे सर्व आरोपी ठाणे कारागृहात आहेत. यास्मीनकडे इतका शस्त्रसाठा कोणाकडून पुरविण्यात आला. तसेच ती कोणत्या गॅंगसाठी काम करत होती का ?, कोणाच्या हत्येचा कट रचला जात होता का ? अशा अनेक प्रश्नांची उकल पोलीस तपासात होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसArrestअटकDawood Ibrahimदाऊद इब्राहिम