शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

असंतुष्टांचे भाजपमध्ये आम्ही स्वागत करतो, पक्ष फोडण्यात रस नाही; रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:14 IST

देवेंद्र फडणवीस व अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. पण...

भिवंडी : भाजपला कोणताही दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात रस नाही. कोणताही पक्ष आम्ही स्वत:हून फोडत नाही. पण एखाद्या पक्षात फूट पडून त्यातून लोक आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्या सोबत एकत्र यायला आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. शुक्रवारी रात्री दानवे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडीतील निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हेही होते. याप्रसंगी पाटील यांच्या वतीने देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात स्वातंत्र्य काळात सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने केली. आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात. देवेंद्र फडणवीसअशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. पण त्यांच्यामध्ये असंतोष असेल तर त्याचा आम्ही आता काही उपयोग करणारा नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल, उपयोग होईल असे वाटेल  तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ, आज आम्हाला कोणाची गरज नाही.

विचारांशी सहमत व्हावेकोणी आपल्या पक्षात असंतुष्ट असल्याने आमच्या पक्षात आले तर त्यांचे स्वागत आहे. केवळ त्यांनी आमच्या विचारांशी सहमत व्हावे, ही आमची अट आहे असे दानवे यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाण