शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमधील भाजपा मंडळाचे काही तत्कालीन अध्यक्ष सेनेच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 18:47 IST

मीरा-भार्इंदरमधील विविध ठिकाणच्या भाजपा मंडळांचे बहुतांशी कार्यरत अध्यक्षांना नारळ देत त्यांच्या पदावर पक्षातील आयारामांची वर्णी लावल्याने नाराज झालेले काही तत्कालीन अध्यक्ष आपल्या समर्थकांसह सेनेत जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदरमधील विविध ठिकाणच्या भाजपा मंडळांचे बहुतांशी कार्यरत अध्यक्षांना नारळ देत त्यांच्या पदावर पक्षातील आयारामांची वर्णी लावल्याने नाराज झालेले काही तत्कालीन अध्यक्ष आपल्या समर्थकांसह सेनेत जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.मीरा-भार्इंदरमधील भाजपात गटातटाच्या राजकारणाला पालिका निवडणुकीपूर्वी सुरुवात झाली होती. त्यात आ. नरेंद्र मेहता यांचा एक गट तर त्यावेळच्या महापौर गीता जैन यांचा एक निर्माण झाला होता. मेहता यांनी जैन यांच्या गटाला निवडणुकीतच सुरुंग लावण्यास सुरुवात केली. आपल्या मर्जीतील बहुतांशी लोकांना त्यांनी उमेदवारी दिली. आपल्याविरोधात बंड करणा-यांना त्यांनी निवडणुकीतुन बाजुला सारण्यासाठी यथोचित खेळी केली. त्यात ते यशस्वी झाले. निवडणुकीतील बहुमतामुळे त्यांनी पालिकेची सत्ता आपल्याभोवती केंद्रीत केली. त्यांनी आपल्या वहिनी डिंपल यांना महापौरपदी विराजमान केले. तर गटनेतापद आपल्याच मर्जीतील हसमुख गेहलोत यांना बहाल केले. तसेच स्थायीसह विविध समित्यांवरही त्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावुन जैन यांच्या गटाला त्यांनी चारीमुंड्या चीत करण्यास सुरुवात केली. त्यातच शहरातील काही मंडळांच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले जैन गटाच्या समर्थकांची त्यांनी ५ डिसेंबरच्या गुप्त बैठकीत गच्छंती केली. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक मंडळांच्या कार्यावर अंकुश ठेवल्याचे कारण देण्यात येत असले तरी या अध्यक्षांमध्ये काही जण जैन गटाचे असल्यानेच त्यांचे मंडळ बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते.एकूण १२ मंडळांची संख्या १०वर आणून किरण चेऊलकर यांच्या शांतीपार्क तसेच डॉ. राजेंद्र जैन यांच्या भार्इंदर स्टेशन मंडळाचा कारभार मात्र गुंडाळण्यात आला. त्या १० मंडळांवर कार्यरत असलेले भार्इंदर पश्चिम मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुशील अग्रवाल यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पूर्वेचे मंडळ अध्यक्ष राकेश शहा यांच्या जागी अभिषेक भटेवडा, नवघर मंडळाचे अध्यक्ष शिवकुमार भुदेका यांच्या जागी माजी नगरसेवक मधू पुरोहित, काशी मंडळाचे अध्यक्ष सी. पी. चौहान यांच्या जागी अनिल ताटे, सृष्टी मंडळाचे अध्यक्ष गजानन नागे यांच्या जागी सुरेश दुबे, उत्तन मंडळाचे अध्यक्ष कोळी यांच्या जागी हेरल बोर्जिस, नयानगर मंडळाचे अध्यक्ष एस. पी. मौर्या यांच्या जागी मुनाफ पटेल, गोल्डन नेस्ट ते मीरा रोड मंडळाचे अध्यक्ष संजय थेराडे यांच्या जागी गोल्डन नेस्ट मंडळावर दिपक सावंत तर कनाकिया मंडळावर दिपू नानकवानी व मीरारोड मंडळाचे अध्यक्ष मनोज दुबे यांच्या जागी डॉ. पोपट यांची नियुक्ती करण्यात आली.नव्याने मंडळ अध्यक्षपदी वर्णी लागलेले बहुतांशी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस, शिवसेना या पक्षातून भाजपात आलेले असतानाही भाजपातील निष्ठावंतांना डावलून मर्जीतील आयारामांना संधी दिल्याने मंडळ अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या काही नाराजांनी माजी महापौर गीता जैन यांना संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासह भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडे देखील तक्रारी केल्या. मात्र स्थानिक भाजपातील एकाधिकारीशाही विरोधात कोणी कारवाईचा बडगा उचलण्यास तयार नसल्यानेच नाराजांपैकी काहींनी सेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधुन सेनेतील प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपा