शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

थकबाकी वसुलीसाठी ठामपा करणार पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:23 AM

ठाणे महानगरपालिकेची मोहीम ; मोठ्या थकबाकीदारांना करणार लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका ठाणे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाला बसला आहे. परंतु, असे असतानाही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत जास्तीची वसुली केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत ६४ कोटी दोन लाख ७२ हजार २१ रुपयांची वसुली केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती अधिक आहे. परंतु, आता गेली कित्येक वर्षे पाण्याची बिले थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांच्या विरोधात पाणीपुरवठा विभागाने मोहीम उघडली आहे. त्यानुसार, त्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

यावर्षीचे आर्थिक वर्ष संपायला काही दिवस राहिलेले असताना देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. तेव्हापासून बहुतांश आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. दोन महिन्यांनंतर जूनपासून पालिकेच्या मालमत्ताकराची वसुली सुरू झाली. तर, जुलैअखेरपासून पाणीबिलाची वसुली सुरू असून गेल्या वर्षी १ एप्रिल ते २२ नोव्हेंबरदरम्यान ५३ कोटी ३१ लाख तीन हजार ७९७ रुपयांची वसुली केली होती. मात्र, यंदा कोरोनाकाळात याचदरम्यान ६४ कोटी दोन लाख ७२ हजार २१ रुपयांची वसुली केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती १२ कोटी अधिक आहे. परंतु, आता ती वाढविण्याबरोबर महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार, आता कित्येक वर्षे थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांची यादी तयार करून मोठ्या थकबाकीदारांचे पाणीकनेक्शन कट करण्याची मोहीम मागील १५ दिवसांपासून सुरू केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपनगरअभियंता विनोद पवार यांनी दिली. यामध्ये वाणिज्य पाणीकनेक्शनबरोबरच इमारतधारकांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला मोठे थकबाकीदार, त्यानंतर कमी रकमेचे थकबाकीदार अशी वर्गवारी करून टप्प्याटप्प्याने ती सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

कर्मचाऱ्यांचा ताफामहानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याने थकबाकी वसुली प्राधान्याने आणि काहीशी कठोरतेनेच केली जाणार आहे. त्यामुळे ही मोहीम पालिकेसाठी महत्वाची असून, यासाठी पालिकेचे ४० मीटररीडर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीम सज्ज आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका