बुधवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद; या भागात बंद राहणार...
By अजित मांडके | Updated: May 27, 2024 13:13 IST2024-05-27T13:13:37+5:302024-05-27T13:13:49+5:30
शट डाऊन संपल्यावर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

बुधवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद; या भागात बंद राहणार...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :पावसाळापूर्व अत्यावश्यक निगा व देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणी पुरवठा योजना आणि स्टेम प्राधिकरण या दोन्हींकडे बुधवार, २९ मे, २०२४ रोजी सकाळी ९ ते गुरूवार, ३० मे रोजी सकाळी ९ असा २४ तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे.
त्यामुळे त्या काळात ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन यांच्यासह मुंब्रा आणि कळवा यांचा काही भाग येथील पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
शट डाऊन संपल्यावर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, तसेच, पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.