मुंब्रा परिसरात गुरूवारी पाणीपुरवठा बंद
By अजित मांडके | Updated: November 8, 2023 21:22 IST2023-11-08T21:21:59+5:302023-11-08T21:22:08+5:30
ठाणे : मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा रेल्वे फास्ट ट्रॅकवरील पुलालगत ३५० मी. मी.व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती काढण्याचे काम ...

मुंब्रा परिसरात गुरूवारी पाणीपुरवठा बंद
ठाणे: मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा रेल्वे फास्ट ट्रॅकवरील पुलालगत ३५० मी. मी.व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती काढण्याचे काम करण्यात येणार आहे.
या कामासाठी मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरूवार, ०९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या काळात पाणी पुरवठा बंद राहील. या काळात रेतीबंदर, दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, मुंब्रादेवी, जीवनबाग, ठाकूरपाडा, आनंद कोळीवाडा, सम्राट नगर, संजय नगर, गावदेवी परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद राहील याची नागरीकांनी नोंद घ्यावी. या दुरुस्ती कामामुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.