शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 17:38 IST

कल्याण डोंबिवली महापालिका परिसरासर औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती बारवी धरण प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

डोंबिवली- कल्याण डोंबिवली महापालिका परिसरासर औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती बारवी धरण प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने काल शुक्रवारी बारवी धरणाला भेट देण्यात आली. यावेळी ही माहिती दिली. बारवी धरणाची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बारावी धरणात पाणीसाठा वाढणार आहे. त्यासाठी धरणाला 11 वक्र  पध्दतीचे दरवाजे बसविण्यात आले आहे. तोंडली, मोहघर, काचकोळी, सुकाळवाडी, कोळेवडखळ, मानिवली ही गावे आणि जांभूळवाडी, महरकवाडी, देवपाडा, खामघर,बुरडवाडी या पाडय़ातील सुमारे 765 कुटुंबियांचे पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास अधिकाऱ्याने यावेळी व्यक्त केला. ज्या ठिकाणी  वक्र दरवाजे बसवण्यात आले आहेत. त्या 80 मी लांबीचा बांध दगडाने बांधण्यात आला आहे. धरणाचे तिसऱ्या टप्प्याचे बांधकाम सांडव्यार्पयत येऊन थांबले असून 68.60 मीटरवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. नॉन ओव्हर फ्लो विभागाची उंची वाढवण्याचे काम 65 मीटर्पयत पूर्ण झाले आहे. सध्या हे वक्र दरवाजे उघडे करून ठेवण्यात आले आहेत. 

औद्योगिक विकास महामंडळाने बारवी धरणावर पाच मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत केंद्र उभारण्यास खाजगी तत्वावर परवानगी दिली असून वीज निर्मितीपासून महामंडळाची सुमारे 6 कोटी रूपयांची बचत होणार आहे. संपूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर म्हणजे 340.48 द ल घ मी इतका साठा झाल्यानंतर वीजनिर्मिती सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. अजून पुर्नवसनाचे काम शिल्लक असल्याने यंदा ही धरणात पाणीसाठा 68.80 मीटर इतका होणार आहे. सध्या पंधरा दिवसातून एकदा पाणी कपात केली जाते. यामुळे 15 जुलैर्पयत आणखी पाणी कपात करण्याची गरज नाही. मात्र याचा निर्णय लघू पाटबंधारे विभाग घेते याकडे त्यांनी लक्ष वेधले.