शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मतदारराजावर ‘बदाबदा’, पाणीकपात सहा तासांनी केली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 04:44 IST

महापालिकेचा निर्णय : पाणीकपात सहा तासांनी केली कमी

ठाणे : लोकसभा निवडणुकीची चौथ्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना दोन दिवसांनी जारी होत असतानाच ठाणे महापालिकेने स्टेम आणि स्वत:च्या योजनेतून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातील कपात ही ३० तासांवरून २४ तासांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांना दिलासा मिळणार आहे. तसेच कळव्याच्या काही भागांतही यामुळे पाणीकपात थोड्या प्रमाणात कमी होणार आहे.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतल्यामुळे ठाणेकरांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत पाणीकपात सुरू झाली आहे. सुरुवातीला ही कपात १२ तासांची होती, त्यानंतर त्यात वाढ होऊन ती ३० तासांपर्यंत केली. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ठाणेकरांना पाणीकपातीच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत होत्या. ३० तासांच्या पाणीकपातीमुळे शहरासह कळवा, मुंब्य्रातील अनेक उंचावरील भागांना पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ठाणेकर चांगलेच मेटाकुटीला आले आहेत.

ठाणेकरांची ही संतापाची भावना लक्षात घेऊन आणि लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ठाणे मतदारसंघातील निवडणुकीची धामधूम सुरू होत असल्याने ठाणे महापालिकेने आता पाणीकपात कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील नौपाडा, कोपरी, माजिवडा, घोडबंदर, वागळे इस्टेट, किसननगर, रायलादेवी आदींसह कळव्यातील काही भागांना दिलासा मिळणार आहे.दुसरीकडे एमआयडीसीचा पाणीपुरवठा हा कळव्याचा काही भाग, मुंब्रा आणि दिवा येथे होत आहे. परंतु, या भागात ३० तासांची पाणीकपात कायम राहणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. येथील पाणीकपात २४ तासांवर आणण्यासाठी एमआयडीसीला पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. परंतु, अद्याप त्यांच्याकडून अपेक्षित असे सहकार्य मिळू शकलेले नाही.मतदान होताच कपात वाढणार? : ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर या भागातील पाणीकपात वाढवली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत यापूर्वी दिले गेले आहेत. त्यामुळे सध्याचा दिलासा हा तात्पुरता असून त्यानंतर पुन्हा अधिक तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाElectionनिवडणूक