ठाण्यात शुक्रवारी पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 12:08 IST2023-05-25T12:08:20+5:302023-05-25T12:08:25+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत.

ठाण्यात शुक्रवारी पाण्याचा ठणठणाट
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल-दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्तीच्या कामांमुळे शुक्रवार, २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांसाठी ठाणे शहराचा पाणी बंद राहणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत. यासाठी २४ तासांचा शटडाऊन हाेणार आहे. घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधीनगर, रुस्तुमजी, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९.०० ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत बंद राहील.
गुरुवारी कोपरीत पाणी नाही
धोबीघाट जलकुंभाची ५०० मिमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकासकामात बाधित असल्याने स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. कोपरी परिसरातील धोबीघाट व कन्हैयानगर जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहील.