शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

कल्याणच्या १४ गावाना तीव्र पाणी टंचाई; केमिकल्स मिश्रित पाण्याकडे ठाणे जि.प.च्या दुर्लक्षाने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:04 IST

केमिकल्स कंपन्यांमधील भंगार,ड्रम कुर्ला, कल्याण आणि उल्हासनगर येथील भंगारवाले विकत घेतात. त्यातील केमिकल्स ते परिसरातच ओतत आहेत. मोठ्याप्रमाणात टाकण्यात येत असलेले केमिकल्स बोरिंगमध्ये झिरपले आहे. यामुळे बोरिंगचे पाणी केमिकल्स मिश्रित झाले. या विषारी पाण्याचा सामना करणाºया १४ गावातील नारिकाना तीव्र पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील या गावाना महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाव्दारे(एमजेपी) पाणी पुरवठा होतो. एमजेपीच्या या प्रशासनाकडून खासदार - आमदारांची शाबासकी मिळवण्यासाठी तात्पुरते एमआयडीसीचे पाणी सोडले . एमआयडीसीचा व्हॉल खोलून सुरळीत पाणी पुरवठा असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच एका कार्यक्रमाव्दारे भासवल्याच्या वृत्तासही पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देबोरिंगमध्ये केमिकल्स झिरपल्यामुळे गावकऱ्यांना केमिकल्स मिश्रित पाणी पिण्याचा प्रसंगएमजेपीच्या नियंत्रणात साडे सहा कोटी रूपये जिल्ह परिषदेने खर्च केल्याचे दिसून येत आहे.सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पुन्हा साडे बारा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे

सुरेश लोखंडेठाणे : नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेले १४ गांवे ठाणे जिल्हा परिषदेत (जि.प.) समाविष्ट करण्यात आले. मात्र त्यांना अत्यावश्यक सोयी , सुविधांसह तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बोरिंगमध्ये केमिकल्स झिरपल्यामुळे गावकऱ्यांना केमिकल्स मिश्रित पाणी पिण्याचा प्रसंग ओढावला.पाण्याच्या नावाखाली साडेसहा कोटींची उदळपट्टी करणाऱ्यां प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याच्या वृत्तास जि.प. सदस्य रमेश पाटील यांनी दुजोरा दिला.केमिकल्स कंपन्यांमधील भंगार,ड्रम कुर्ला, कल्याण आणि उल्हासनगर येथील भंगारवाले विकत घेतात. त्यातील केमिकल्स ते परिसरातच ओतत आहेत. मोठ्याप्रमाणात टाकण्यात येत असलेले केमिकल्स बोरिंगमध्ये झिरपले आहे. यामुळे बोरिंगचे पाणी केमिकल्स मिश्रित झाले. या विषारी पाण्याचा सामना करणाऱ्यां १४ गावातील नारिकाना तीव्र पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील या गावाना महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणाव्दारे (एमजेपी) पाणी पुरवठा होतो. एमजेपीच्या या प्रशासनाकडून खासदार - आमदारांची शाबासकी मिळवण्यासाठी तात्पुरते एमआयडीसीचे पाणी सोडले . एमआयडीसीचा व्हॉल खोलून सुरळीत पाणी पुरवठा असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच एका कार्यक्रमाव्दारे भासवल्याच्या वृत्तासही पाटील यांनी दुजोरा दिला आहे.एमजेपीच्या नियंत्रणात साडे सहा कोटी रूपये जिल्ह परिषदेने खर्च केल्याचे दिसून येत आहे. त्याव्दारे अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाक्या आणि तुटलेली पाइप लाइन दिसून येत आहे. सुमारे २०१४ मध्ये मंजूर झालेल्या या साडे सहा कोटींच्या कामातून तांब्याभर पाणी देखील १४ गावाना आजपर्यंत मिळालेले नाही. २७ महिन्यात काम पूर्ण करायचे होते. मात्र ते आजपर्यंतही पूर्ण झाले नाही. संबंधीत ठेकेदार कंपनीला जिल्हा परिषद व एमजेपी पाठिशी घालून गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसायला भाग पाडत आहे. साडे सहा कोटी खर्चाचे काम दाखवण्यासाठी नवी मुंबईच्या जुन्या पाइप लाइनला व्हॉल लावून ती गृहीत धरण्याचा पराक्रमही प्रशासनाने केला. जुन्या लाइनमुळे ती सतत फूटत आहे. प्रेशरने पाणी सोडता येत नाही. यामुळे १४ गावातील नागरिकाना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आणून दिली. पण त्यावर काहीच केले जात नसल्याची खंत पाटील यांनी लोकमतकडे व्यक्त केली.सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पुन्हा साडे बारा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचे सांगितले जात आहे. पण आधीच्या साडे सहा कोटींच्या खर्चाचे मात्र कोणी ऐकूणच घ्यायला मागत नसल्याची खंत लोकप्रतिनिधी म्हणून पाटील यांनी व्यक्त केली. या परिसरात १९ गावांचा समावेश आहे. त्यातील वडवली, शिरडोन खानिवडे आदी गावाना बऱ्यांपैकी पाणी मिळते. पण खोणी, अंतरर्ली, पागड्याचा पाडा, दहिसर, पिंपरी, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, भंडारली, उत्तरशीव, गोठेघर, नारिवली, बाळे आणि वाकळन आदीं गावकऱ्यांना गंभीर पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या तीव्र संतापातून नांगावला कृषीचा कार्यक्रम महिला घेऊ दिला नाही. तीन महिन्यात पाणी समस्या दूर करण्याचे आश्वासन देऊनही लोकप्रतिनिधींनी काम केले नसल्याचा राग या गावकऱ्यांमध्ये असल्याची जाणीव पाटील यांच्यासह काही गावकऱ्यांनी निदर्शनात आणून दिली.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद