महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांची मनधरणी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 12:12 AM2018-12-14T00:12:40+5:302018-12-14T00:13:27+5:30

विकास प्रकल्पांनी धरला जोर; निवडणुकांपूर्वी सरकारला भूमिपूजनाची घाई

Farmers' congratulations for ambitious projects | महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांची मनधरणी सुरूच

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांची मनधरणी सुरूच

Next

- सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील मेट्रो लाइन ४, ५ आणि ९ या मार्गिकांचे भूमिपूजन आणि सिडकोच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती लाभणार आहे. मात्र, सुमारे २४ किमी. लांबीच्या मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही बाजूस असलेला व १२८ गावांतून जाणारा विरार - अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर आणि जिल्ह्यात ३९.६६ किमी. धावणारी बुलेट ट्रेन आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेतकºयांच्या मनधरणीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. अन्यथा विरार-अलिबाग कॉरिडोरचेही मेट्रोच्या मुहूर्तावर, म्हणजेच १८ डिसेंबरला भूमिपूजन करता आले असते.

स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावरील जिल्ह्यातील महापालिकांच्या परिसरात विकासप्रकल्पांनी सध्या जोर धरला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या आखत्यारीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प युद्धपातळीवर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी त्यांच्या भूमिपूजन सोहळ्यांना महत्त्व आले आहे. यास अनुसरून जिल्ह्यातील मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम १८ डिसेंबरला हाती घेतला. तिच्या दोन्ही बाजूकडून जाणारा विरार - अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर ठाणे जिल्ह्यातून ३९.६६ किमी. जात आहे. याशिवाय या दोन्ही प्रकल्पांच्या मधून नॅचरल गॅसचा पाइपलाइनचाही प्रकल्प आहे. मात्र, भूसंपादनात अडकलेल्या या प्रकल्पांसाठी संबंधित शेतकºयांची मनधरणी प्रशासनाद्वारे सुरू आहे.
ठाणे - कल्याण - भिवंडी या मेट्रो प्रकल्पाचे कल्याण एपीएमसी मार्केट हे पहिले स्टेशन आहे. त्यानंतर कल्याण मेट्रो स्टेशन, सहजानंदचौक, दुर्गाडी, आधारवाडी, गोवेगाव एमआयडीसी, रांजनोली, टेमघर, गोपाळ नगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूरफाटा, पूर्णा, कोलशेत आणि कशेळी, बाळकूमनाका आणि कापूरबावडी आदी या मेट्रोची प्रमुख १७ स्टेशन आहेत. सुमारे ८७६ कोटी ७९ लाखांच्या खर्चाच्या या मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

मल्टिमोडल कॉरिडॉरवर १२,९७५ कोटींचा खर्च
एमएमआरडीएच्या नियंत्रणातील हा प्रकल्प आहे, त्यावर १२ हजार ९७५ कोटी रुपयांचा होता. यात पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर हा ७९ किमीचा मार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यावर नऊ हजार ३२६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर, दुसºया टप्प्यातील चिरनेर ते अलिबाग ४७ किमी. मार्गाच्या बांधणीसाठी तीन हजार ६४९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. विरार ते अलिबाग या कॉरिडोरमुळे पालघर-ठाणे-रायगड तिन्ही जिल्हे जवळ येणार असून याचा सर्वाधिक फायदा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटी बंदराला होईल. येथील कंटेनर वाहतूक शीघ्रगतीने होणार आहे.

Web Title: Farmers' congratulations for ambitious projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.