शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

उन्हाच्या कडाक्याने पाणीसाठ्यात घट

By admin | Updated: April 19, 2016 02:16 IST

कडक उन्हामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना

ठाणे: कडक उन्हामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना, तर कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी व आंध्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा असून बारवी धरणात २९ टक्के साठा शिल्लक आहे. यावरून, दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पाणीसाठ्यामुळे दुष्काळाच्या झळा गडद होऊ लागल्याचे उघड झाले आहे.या धरणांमधील पाणीसाठा १२ दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. बारवी धरणात ३६ टक्के असलेला पाणीसाठा सात टक्क्यांनी कमी झाला आहे. या धरणात सध्या ५३.७६ दशलक्ष घनमीटर (२९ टक्के) साठा आहे,तर आंध्रातील तीन टककयांनी कमी झालेला पाणीसाठा ६२.१० दशलक्ष घनमीटर (दलघमी) शिल्लक आहे. पाण्याच्या दैनंदिन वापरासह सतत वाढत असलेल्या तीव्र उष्णतेमुळे तो झपाट्याने आटत आहे. पाणीकपात लावलेली असली तरी उपलब्ध साठ्यातून पाण्याचा उपसा हा सुरूच आहे. उन्हाची तीव्रताही वाढत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही सुरूच आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे आगामी पाणीसंकटाची तीव्रता लक्षात येत आहे. पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांमध्येही चांगल्या प्रमाणात जागृती झाली आहे. कपात आता त्यांच्या अंगवळणी पडली असली तरी उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे जुने स्रोत बळकट करण्यासाठीदेखील प्रशासनाने युद्धपातळीवर उपक्रम हाती घेण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. हा पाणीसाठा याच वेगाने घटत गेल्यास येत्या काही दिवसांत सध्याची पाणीकपात आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)> ठाण्यातील पाणखंडा स्वातंत्र्यपूर्व काळापासून तहानलेलाच ठाणे : स्वातंत्र्यपूर्व काळापासून घोडबंदर भागातील पाणखंडा गावातील आदिवासीपाड्याला आजही पिण्याच्या पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजूबाजूला वसलेल्या नव्या गृहसंकुलांना मुबलक पाणी असताना या पाड्याला मात्र नादुरुस्त बोअरवेल आणि झऱ्याच्या दूषित पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे आम्हाला आता पाण्याचे अधिकृत कनेक्शन द्यावे, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी २४ टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचे पडसाद आता तीव्र उमटू लागले आहेत. ठाणे शहरात ४८ तासांचे तर कळवा, मुंब्य्राला ६० तासांचे शटडाऊन सुरू आहे. या भागांना किमान पाणीपुरवठा तरी होत आहे. परंतु, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ठाण्यात वास्तव्य करीत असलेल्या पाड्याला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.घोडबंदर येथील पाणखंडा हे आदिवासींचे असेच एक गाव असून येथे सुमारे १५०० लोकांचे वास्तव्य आहे. याच भागात महापालिकेची शाळादेखील आहे. परंतु, या पाड्याला महापालिका स्थापन झाल्यानंतरही आजतागायत पिण्याचे पाणी मिळालेले नाही. या पाड्यात पाच बोअरवेल असून त्यातील दोन बंद असून उर्वरित तीन सुस्थितीत आहेत. परंतु, त्यातूनही पिवळसर दूषित पाणी येत असून काही वेळेस किडे आणि मुंग्याही पडत असल्याने त्या असून नसल्यासारख्या आहेत. त्यामुळे येथील रहिवासी पाण्यासाठी दूरवर एक किमी अंतरावर असलेल्या एका झऱ्याचे पाणी सध्या पित आहेत. परंतु, ते पिण्यास अयोग्य असेच आहे. पर्याय नसल्याने त्यावरच रहिवाशांना सध्या राहावे लागत आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला नव्याने निर्माण होणारी गृहसंकुले आणि बंगल्यांना मुबलक पाणी असताना आम्हाला मात्र पाण्यासाठी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार करावा लागत असल्याचा टाहो या आदिवासींनी फोडला आहे. दरम्यान, येथील रहिवासी राजेंद्र पाटील यांनी झऱ्याचे आणि बोअरवेलच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे दिले होते. या विभागाने दिलेल्या अहवालानुसार बोअरवेल आणि झऱ्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. असे असले तरी दुसरा पर्यायच नसल्याने नाइलाजाने या आदिवासींना याच पाण्यावर जीवन व्यतीत करावे लागत आहे. विशेष म्हणजे हे पाणी प्यायल्याने लहान मुलांना कावीळ, जुलाब आदींसह इतर आजारांची लागण झाली आहे. (प्रतिनिधी)