उल्हासनगरात इमारतीच्या सेक्रेटरीकडून वॉचमनचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:55 IST2018-06-20T02:55:07+5:302018-06-20T02:55:07+5:30

कॅम्प नं. २ खेमानी परिसरातील मेनका पॅलेस या इमारतीच्या सेक्रेटरीनेच वॉचमनचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

Watchmen's blood from the building's secretary in Ulhasnagar | उल्हासनगरात इमारतीच्या सेक्रेटरीकडून वॉचमनचा खून

उल्हासनगरात इमारतीच्या सेक्रेटरीकडून वॉचमनचा खून

उल्हासनगर : कॅम्प नं. २ खेमानी परिसरातील मेनका पॅलेस या इमारतीच्या सेक्रेटरीनेच वॉचमनचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सेक्रटरी तलरेजा यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून साफसफाईच्या क्षुल्लक कारणावरून खून झाल्याचे उघड झाले.
विकास सोनार आणि त्याचे कुटुंब हे मेनका पॅलेस येथे वॉचमनचे काम करते. सोमवारी इमारतीची साफसफाई का केली नाही, असा प्रश्न इमारतीचा सेक्रटरी विक्की तलरेजा यांनी विकास सोनार यांना केला. आजारी असल्याने साफसफाई केली नाही, आता करतो असे वॉचमनने सांगितले. यावरून दोघांत बाचाबाची झाली. विक्की याने रागाच्या भरात वॉचमनला मारहाण केली आणि तो निघून गेला. खाली निपचित पडलेल्या वॉचमनला पत्नी अनिता हिने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसला आहे.
मारहाण तसेच गळा दाबल्याने वॉचमनचा मृत्यू झाल्याचे उल्हासनगर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी इमारतीचा सेक्रटरी विक्की तलरेजा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेने उल्हासनगर परिसरात खळबळ उडाली असून, क्षुल्लक कारणावरून खून करण्याचा प्रकार दु:खदायक असल्याचे बोलले जाते.

Web Title: Watchmen's blood from the building's secretary in Ulhasnagar