शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
3
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
4
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
5
अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ
6
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
7
Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?
8
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
9
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
10
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
11
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
12
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
13
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
14
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
15
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
16
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
17
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
18
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
19
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
20
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

घंटागाड्यांच्या कामचुकारीवर जीपीएसचा वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 3:05 AM

प्रत्येक ठिकाणचा कचरा उचलला जातो अथवा नाही, घंटागाड्या वेळेत पोहचतात किंवा नाही, त्यांच्याकडून कामचुकारपणा होता का? यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारीपासून १६० घंटागाड्या जीपीएस प्रणालीला जोडल्या आहेत.

ठाणे : प्रत्येक ठिकाणचा कचरा उचलला जातो अथवा नाही, घंटागाड्या वेळेत पोहचतात किंवा नाही, त्यांच्याकडून कामचुकारपणा होता का? यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारीपासून १६० घंटागाड्या जीपीएस प्रणालीला जोडल्या आहेत. त्याचा चांगलाच फायदा झाला असून कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदारांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करून आतापर्यंत १५ लाखांचा दंड वसूल केला आहे. यामुळे घंटागाड्यांना शिस्त लागल्याचा दावा पालिकेने केला आहे.ठाणे महापालिकेच्या घंटागाड्यांवर सुरुवीताला कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. जो भाग ज्या घंटागाडीसाठी देण्यात आला त्या भागात ती जाते किंवा नाही, याबाबतदेखील कोणतीच माहिती पालिकेला उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे अनेक भागातील कचरा न उचलणे, तो पडून राहणे अशा अनेक समस्यांना पालिकेला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळेच या समस्येवर मात करून घंटागाड्यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने जीपीएस प्रणालीचा आधार घेतला. त्यानुसार ही प्रणाली जानेवारी महिन्यात सुरू झाली आहे. यानुसार प्रत्येक घंटागाडीवर एक चीप बसवली आहे. तिच्या माध्यमातून दिवसभरात संबधित घंटागाडी कुठे, कोणत्या भागात, किती किमी फिरली, याची माहिती अधिकाºयांना एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. या घंटागाडयÞांवर व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅण्ड मॉनेटेरिंग ही यंत्रणा बसवली आहे. त्यानुसार आता पालिका आणि कंत्रटदाराच्या मिळून एकूण १६० वाहनांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यासाठी प्रतिमाह १ लाख ४४ हजार खर्च अपेक्षित असून तीन वर्षाच्या देखभाल दुरु स्तीसाठी ५२ लाख १६ हजार रु पयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.>ही प्रणाली यशस्वी झाल्याचा दावा पालिकेने केला असून कामचुकार करणारे ठेकेदार आणि घंटागाडी कर्मचाºयांवरदेखील यामुळे अंकुश बसला आहे. जानेवारी ते आतापर्यंत पालिकेच्या घनकचरा विभागाने रोजच्या फेरीचे एका घंटागाडीचे ३ हजार रुपये आणि त्यावरील तेवढ्याच स्वरुपाचा किंवा त्याहून अधिकचा दंड वसूल केला आहे. त्यानुसार या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत १५ लाखांचा दंड वसूल झाला असून यामुळे घंटागाडी कर्मचारी आणि ठेकेदारांनादेखील शिस्त लागली आहे.