मीरा-भाईंदरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; वर्गीकरण होत नसल्याने उचलण्यास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:17 AM2019-10-31T00:17:43+5:302019-10-31T00:17:54+5:30

प्रशासन म्हणते, कचरा वाढला

The waste empire in Mira-Bhayander; Late pick up because no classification occurs | मीरा-भाईंदरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; वर्गीकरण होत नसल्याने उचलण्यास उशीर

मीरा-भाईंदरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; वर्गीकरण होत नसल्याने उचलण्यास उशीर

googlenewsNext

मीरा रोड : ऐन सणासुदीला शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पडून असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तर दिवाळीत कचºयाचे वाढलेले प्रमाण तसेच कचºयाचे वर्गीकरण करून नागरिक देत नसल्याने कचरा उचलला गेला नसल्याचा दावा प्रशासन करत आहे.
मीरा- भाईंदरमध्ये दिवाळीच्या सणादरम्यान ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचून असल्याचे दिसत आहे. कचºयाचे ढीग पडून असल्याने दुर्गंधी पसरून त्यावर घुशी, भटकी जनावरे आदींचे प्रमाण वाढत आहे. भर रस्ता वा नाक्यावर साचलेल्या कचºयाच्या ढीगांमुळे नागरिकांना चालणे जिकरीचे झाले आहे.

सणाच्यावेळी तरी शहरात स्वच्छता असायला हवी होती. मात्र महापालिका डोळेझाक करत असल्याने शहरात कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका मात्र दिवाळीत कचºयाचे प्रमाण वाढल्याने हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत आहे. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे म्हणाले की, एरव्ही ५०० टन रोज निघणारा कचरा दिवाळी सणात ६०० टनावर गेला आहे.

१०० टनाने कचरा वाढल्याने सफाई कामगार आणि वाहन व्यवस्था अपुरी पडत असल्याचे मुख्य कारण आहे. शिवाय सुट्टीनिमित्त कामगारांच्या रजांचा परिणाम कामावर झाला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून देणे कायद्याने बंधनकारक असतानाही काही गृहनिर्माण संस्था व नागरिकांकडून कचरा वेगळा करून दिला जात नसल्याने त्यांचा कचरा न उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचेही कारण शहरात कचरा साचण्यामागे असल्याचे ते म्हणाले.

नागरीकांमधून मात्र महापालिकेचा हा खोटारडेपणा असून शहरातील कचरा त्वरित उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची तातडीची गरज असल्याचे म्हटले जात आहे. कचरा वर्गीकरण स्वत: पालिका आणि लोकप्रतिनिधीही करत नाहीत. कंत्राटी कामगारांची संख्या कमी असून आहेत ते प्रामाणिकपणे काम करत नसल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

Web Title: The waste empire in Mira-Bhayander; Late pick up because no classification occurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.