शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

भाजपाला मोठा धक्का; मीरा-भाईंदरच्या महापौरांसह तब्बल ३९ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 8:05 PM

BJP Mira Bhayandar News : माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष नेतृत्वास निवेदन दिले असून २४ तारखेपर्यंत विचार केला नाही तर पुढची दिशा ठरवू असा इशारा मेहता समर्थकांनी दिला आहे.  

मीरा रोड - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीरा भाईंदर भाजपा जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती केल्याचे पत्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध होताच मंगळवारी भाजपच्या ६१ पैकी ३९ नगरसेवकांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यास यांच्या नियुक्तीला विरोध करत पक्षाने दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू असे थेट आव्हानच भाजपा नेतृत्वास दिले आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष नेतृत्वास निवेदन दिले असून २४ तारखेपर्यंत विचार केला नाही तर पुढची दिशा ठरवू असा इशारा मेहता समर्थकांनी दिला आहे.  

मीरा भाईंदर भाजपा जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती केल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र सोमवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाले. व्यास हे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. त्यामुळे व्यास यांच्या नियुक्तीने मेहता समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र होते. व्यास यांच्या नियुक्तीबद्दल काही नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असताना मेहता समर्थक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून मात्र व्यास यांच्या नियुक्तीचे स्वागत केले गेले नाही. 

महापालिकेत भाजपाचे ६१ नगरसेवक निवडून आले होते. पालिकेतील महत्वाच्या पदांवर मेहता समर्थकांची वर्णी लागली आहे. मेहता यांची अर्धनग्न अवस्थेतील अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या च्या अनुषंगाने त्यांनी पक्ष सोडल्याचे जाहीर केले असले तरी सत्ताधारी भाजपाच्या पालिकेच्या व पक्ष कामकाजात त्यांचा सहभाग असतो. त्यातच पक्ष संघटना सुद्धा हातात ठेवण्यासाठी मेहता समर्थक व मेहता विरोधक यांच्यात रस्सीखेच आहे. याआधी देखील हेमंत म्हात्रे यांची जिल्हाध्यक्षपदी भाजप नेतृत्वाने नियुक्ती केल्यावरून सुद्धा मेहता समर्थकांनी म्हात्रे यांचा विरोध करत त्यांना जिल्हाध्यक्ष मानत नाही अशी भूमिका घेतली होती.  इतकेच नव्हे तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाईंदर पश्चिम येथील भाजपा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन होऊन सुद्धा त्या कार्यालयास मानत नसल्याची भूमिका घेण्यात आली होती. 

व्यास यांच्या नियुक्तीचे कळतात मंगळवारी मेहता समर्थक काही नगरसेवकांनी सकाळी मेहता यांची भेट घेतली. त्यानंतर खाजगी बस व खाजगी गाड्यांमधून नगरसेवक पदाधिकारी आदी भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात दाखल झाले.  तेथे व्यास यांच्या नियुक्तीला विरोध करणारे पत्र सह्यांच्या यादीसह देण्यात आले . भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा सागर बंगल्यावर भेट घेऊन निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाच्या सोबत जोडलेल्या सह्यांच्या यादीत भाजपच्या ३९ तर शिवसेनेच्या २ नगरसेवकांच्या सह्या आहेत. त्यात महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, स्थायी समिती सभापती दिनेश जैन,  सभागृहनेता प्रशांत दळवी सह प्रभाग समिती सदस्य, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, परिवहन समिती सभापती आदींचा समावेश आहे. 

स्थानिकांना कोणाला विश्वासात न घेताच ह्या नियुक्ती ची माहिती व्हाट्सअपवरील पत्रावरून मिळाल्याचे महापौर हसनाळे म्हणाल्या. त्यामुळे स्थानिक नेते नरेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी पक्ष नेतृत्वाला निवेदन दिले आहे. जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा अधिकार प्रदेशाध्यक्षांना असला तरी स्थानिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला गेला नाही. फडणवीस यांनी २४ तारखेच्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. स्थायी समिती सभापती दिनेश जैन म्हणाले की, मेहता आमचे नेते असून त्यांना व आम्हाला कोणालाच विश्वासात न घेता जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा निर्णय घेतला गेला आहे.  मेहता समर्थक सभागृहनेते प्रशांत दळवी यांनी तर दोन दिवसांची मुदत देत अन्यथा पुढची दिशा ठरवू असा निर्वाणीचा इशारा पक्ष नेतृत्वास दिला आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMira Bhayanderमीरा-भाईंदरPoliticsराजकारण