शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

वाहतूक कोंडी सोडवणा-या वॉर्डनची दिवाळी अंधारात ७५ वॉर्डनची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 2:10 PM

दिवसातले १२ तासांहून अधिक वेळ बाराही महिने उभे राहणा-या वार्डनची दिवाळी अंधारात गेली आहे. तीन महिन्यांनी मिळणारा पगार झाला नसल्याने सगळीकडे दिवाळीत जल्लोषाचे वातावरण असतांना वॉर्डनमध्ये नाराजीचे वातावरण

ठळक मुद्देकल्याण-डोंबिवली-कोळशेवाडीच्या वॉर्डनची समस्या

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. ती कोंडी फोडण्यासाठी शहर वाहतूक पोलीस आणि त्यांचे सहकारी वॉर्डन प्रयत्न करतात. दिवसातले १२ तासांहून अधिक वेळ बाराही महिने उभे राहणा-या वार्डनची दिवाळी अंधारात गेली आहे. तीन महिन्यांनी मिळणारा पगार झाला नसल्याने सगळीकडे दिवाळीत जल्लोषाचे वातावरण असतांना वॉर्डनमध्ये नाराजीचे वातावरण होते.कल्याण,डोंबिवली आणि कोळसेवाडी या वाहतूक विभागात कार्यरत असणा-या ७५ वॉर्डनला ही समस्या भेडसावली. डोंबिवलीतील काही वॉर्डनने लोकमतशी बोलतांना ती नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, दिवाळीचा बोनस सोडाच पण जे महिन्याचे ५ हजार रुपये मिळतात ते पण वेळेत मिळत नाहीत. तीन महिन्यांनी ते मानधन मिळते. हे मानधन तुटपुंजे असून ते देखिल वेळेत न मिळाल्या कुटूंबियांची होणारी परवड बघवली जात नाही. दिवाळीतही सगळीकडे उत्साह होता, पण आमच्या घरांमध्ये मात्र लहान मुले देखिल त्या आनंदापासून वंचित राहील्याची खंत व्यक्त करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पेमेंट मिळते, पण ते वेळेत मिळत नाही. ते वेळेत मिळाल्यास समाधान मिळेल असे सांगण्यात आले.कोट: वॉर्डनचे पेमेंट वेळेत होत नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यासाठी आमच्या विभागाकडून मात्र वेळच्या वेळी महिन्याला पत्रव्यहार केला जातो. दिवाळीत त्यांचे मानधन आलेले नाही. ते जसे येते तसे त्याचे तातडीने वाटप केले जाते - बाबासाहेब आव्हाड, एसीपी,वाहतूक विभाग-कल्याण

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई