दरोडयाच्या तयारीतील फरार आरोपी नऊ वर्षांनी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:21 IST2020-12-18T23:57:33+5:302020-12-19T00:21:45+5:30

गेल्या नऊ वर्षांपासून दरोडयाच्या तयारीतील गुन्हयामध्ये फरारी असलेल्या पप्पू साबिर कुरेशी (३१, रा. रशीद कंम्पाऊंड, मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. मुंब्रा पोलिसांनी २००७ मध्ये त्याला अटक केली होती. जामीनावर सुटल्यानंतर मात्र तो पसार झाला होता.

Wanted accused in decoity preparations jailed after nine years | दरोडयाच्या तयारीतील फरार आरोपी नऊ वर्षांनी जेरबंद

मुंब्रा येथून घेतले ताब्यात

ठळक मुद्दे खंडणी विरोधी पथकाची कारवाई मुंब्रा येथून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दरोडयाच्या तयारीतील गुन्हयामध्ये फरारी असलेल्या पप्पू साबिर कुरेशी (३१, रा. रशीद कंम्पाऊंड, मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्याला मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रशीद कंपाऊंड येथील श्रीलंका कॉम्पलेक्समध्ये राहणाऱ्या कुरेशी याला २००७ मध्ये मुंब्रा पोलिसांनी एका दरोडयाच्या तयारीतील गुन्हयात अटक केली होती. त्याची जामीनावर सुटका झाल्यानंतर तो ठाणे न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे ठाणे न्यायालयाने त्याला २०११ मध्ये फरार घोषित केले होते. गेल्या नऊ वर्षांपासून तो पोलिसांनाही हुलकावणी देत होता. मुंब्रा येथील रशिद कंपाऊंडमध्ये तो येणार असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १८ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार विश्वास मोटे, सुरेश यादव, प्रशांत बुरके, संदीप भांगरे, बाळू मुकणे आणि रोशन जाधव आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Wanted accused in decoity preparations jailed after nine years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.