शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

आयुक्तांनी पत्नीसोबत रंगवल्या भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:22 AM

उन्हातील रविवारची ही रंगपेरणी जशी झोपडपट्टीत उठून दिसत होती, तशीच ती नागरिकांच्या डोळ्यांतही प्रतिबिंबित होत होती.

ठाणे : रविवारची दुपार, रणरणते ऊन, डोंगरीपाडा आणि इंदिरानगर या झोपडपट्टीतून टोकाकडे जाणारा उभा कडा, रंगांच्या माध्यमातून भिंती रंगवण्यात मग्न असलेली मुले... तसेच त्यांच्यात मिसळून त्यांच्यासोबत भिंती रंगवणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांची पत्नी सिद्धी. उन्हातील रविवारची ही रंगपेरणी जशी झोपडपट्टीत उठून दिसत होती, तशीच ती नागरिकांच्या डोळ्यांतही प्रतिबिंबित होत होती.या रंगपेरणीसाठी मुंबई मिसाल या संस्थेच्या अध्यक्षा रूबल नागी, स्थानिक नगरसेविका अर्चना मणेरा, माजी नगरसेवक मनोज प्रधान, साधना प्रधान, रोटरी क्लब ठाणेचे पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपायुक्त संदीप माळवी, ओमप्रकाश दिवटे, अशोक बुरपल्ले, सहायक आयुक्त अनुराधा बाबर, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, विकास ढोले, घनकचरा विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हळदेकर आदी उपस्थित होते. गेल्या आठवड्यापासून इंदिरानगर झोपडपट्टी आणि डोंगरीपाडा येथे झोपडपट्टीमध्ये रंगरंगोटी, साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. पालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या या मोहिमेचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले होते. गेले पाच दिवस ही मोहीम यशस्वीपणे सुरू असून या मोहिमेमध्ये आता स्थानिक नागरिक, मुले मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. या दोन्हीही झोपडपट्ट्यांनी आता कात टाकली असून स्थानिक नागरिकांच्या सहभागाने झोपडपट्ट्यांच्या बाह्यरूपाबरोबरच अंतर्गत रूपही पालटायला सुरुवात झाली आहे. महापालिकेसोबत आता रहिवासीही आपल्या घराच्या दारात कचरा पडणार नाही, याची दक्षता घेऊ लागले आहेत. त्याचबरोबर हे स्थानिक रहिवासी आपल्या समस्यांबाबत महापालिका आयुक्तांशी संवाद साधू लागले आहेत आणि महापालिका आयुक्त त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असून आता या झोपड्यांमध्ये स्थानिक समस्या स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने मार्गी लागत आहेत.पार पडली चित्रकलेची कार्यशाळाठाणे : हाताच्या बाह्या सावरत, चेहºयावरील गरिबीचे मळभ दूर फेकून रविवारी इंदिरानगर झोपडपट्टीतील जवळपास दीडशे मुले चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभागी झाली. त्यांनी रविवारची सुटी चक्क महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत साजरी केली. आयुक्तही सर्व अभिनिवेश विसरून या मुलांमध्ये रममाण झाले. निमित्त होते इंदिरानगर झोपडपट्टीच्या रंगरंगोटीचे. गेल्या आठवडाभरापासून ठाणे शहरातील इंदिरानगर आणि डोंगरीपाडा येथील झोपडपट्टीमध्ये आकर्षक रंगरंगोटीसह नागरिकांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण याविषयी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेला स्थानिकांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये मिसाल संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील मुलांसाठी चित्रकला कार्यशाळा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जवळपास दीडशे मुलांनी सहभाग नोंदवला. यातील उत्कृष्ट चित्रांना महापालिका आयुक्तांच्या हस्ते गौरवण्यात आले. आयुक्तांनी खेळकर वृत्तीने या मुलांशी संवाद साधला. त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्याशी गप्पा मारल्या.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका