शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शववाहिनीच्या लोकार्पणासाठी खासदारांची प्रतीक्षा

By admin | Updated: June 20, 2017 06:22 IST

कुळगाव-बदलापूर नगर परिषदेची जुनी शववाहिनी रस्त्यात कधीही बंद पडत होती. नव्या शववाहिनीचा प्रस्ताव तयारदेखील करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेची जुनी शववाहिनी रस्त्यात कधीही बंद पडत होती. नव्या शववाहिनीचा प्रस्ताव तयारदेखील करण्यात आला. या शववाहिनीला खासदार कपिल पाटील यांनी १२ लाखांचा खासदार निधी दिला. बदलापूर पालिकेत ही नवी शववाहिनी वाहनताफ्यात दाखलदेखील झाली. मात्र, खासदारांच्या हस्ते त्या गाडीचे लोकार्पण न झाल्याने ही शववाहिनी तशीच पडून आहे. त्यामुळे नवी शववाहिनी असतानादेखील जुनीच शववाहिनी वापरण्याची वेळ पालिकेवर आली आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या वाहनताफ्यातील जुनी शववाहिनी नादुरुस्त झालेली आहे. पर्यायी वाहन नसल्याने त्याच गाडीची दुरुस्ती करून ते वाहन चालवले जात आहे. अनेक वेळा अंत्ययात्रेसाठी या शववाहिनीचा वापर करत असताना रस्त्यातच गाडी बंद पडण्याचे प्रकार घडले आहे. एवढेच नव्हे तर अनेकदा अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या दु:खी कुटुंबीयांनाच या गाडीला धक्का मारून गाडी सुरू करण्याची वेळ आली होती. या सर्व प्रकारानंतर खासदार निधीतून नव्या गाडीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यासाठी १२ लाख रुपये खासदार कपिल पाटील यांनी दिले. ही नवी गाडी तयार होऊन पालिकेच्या वाहनताफ्यात दाखलदेखील झाली आहे. शववाहिनी ही एक सेवा असल्याने त्याचा वापर लागलीच होणे गरजेचे होते. मात्र, राजकीय पुढाऱ्यांना सेवेपेक्षा त्या सेवेतून आपली प्रसिद्धी कशी होईल, याचाच विचार जास्त आहे. शववाहिनीच्या बाबतीतही हेच झाले. नवी कोरी शववाहिनी वापराविना पडून राहिली आहे. मात्र, त्या शववाहिनीचा लोकार्पण सोहळा खासदारांच्याच हस्ते करण्याचा हट्ट स्थानिक नेत्यांनी ठेवल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. केवळ लोकार्पण झाले नाही, म्हणून लोकांना शववाहिनी पुरवण्यात येत नसल्याचे पालिकेच्या व्यवस्थेबाबत आणि स्थानिक नेत्यांच्या हट्टाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. तर, दुसरीकडे खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पालिकेला तत्काळ ही शववाहिनी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ही शववाहिनी खरेदीसाठी २०१४ मध्ये निधी दिला होता. पालिकेने शववाहिनी खरेदी केल्याचे मला कळवलेदेखील नव्हते. दोन दिवसांपूर्वी मला शववाहिनीच्या लोकार्पणासाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार, २१ जून रोजी वेळ दिलेली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार यांना विचारले असता त्यांनी येत्या दोन दिवसांत ही गाडी सुरू केली जाईल, असे स्पष्टीकरण दिले.