गॅस सिलेंडरने कूकची हत्या करणाऱ्या वेटरला जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 22:21 IST2021-04-02T22:18:54+5:302021-04-02T22:21:10+5:30
चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलेंडर मारून अजित रॉय (३०) या कुकची हत्या करणाºया मंजीतकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेपेची तसेच मोबाईल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली.

ठाणे सत्र न्यायालयाचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलेंडर मारून अजित रॉय (३०) या कुकची हत्या करणाºया मंजीतकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेपेची तसेच मोबाईल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली. चार वर्षापूर्वी भिवंडीतील एका चायनीज दुकानामध्ये हा प्रकार घडला होता.
भिवंडीतील पूर्णागावात असलेल्या तंदुरी कॉर्नर आणि चायनीज सेंटर या दुकानात वेटर मंजीतकुमार याच्यासह कुक अजित तसेच अन्य कामगार असे तिघे काम करीत होते. हे सर्व कामगार दुकानातच झोपत असे. कामावरून उद्भवलेल्या वादातून दोघांनी एकमेकांना ५ जुलै २०१७ रोजी रात्री शिवीगाळ केली. यावेळी मालकाने त्यांना समजावल्यानंतर यापुढे आम्ही भांडण करणार असे त्यांनी सांगितले. ६ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केल्यानंतर तिघेही कामगार दुकानात झोपले. मालक घरी निघून गेला. परंतु दुसºया दिवशी सकाळी येथील एका पानटपरी चालकाने फोन करून अजितला मार लागल्याची माहिती दिल्यानंतर दुकानमालक आणि त्याचा भाऊ तात्काळ दुकानावर आले. त्यांनी आतमध्ये पाहिले असता, दुकानामध्ये रक्ताच्या थारोळयात अजित पडल्याचे दिसले. त्याच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या शेजारीच रक्त लागलेले गॅस सिलेंडर पडले होते. त्यांनी अजितला नेमके काय झाले याबाबत विचारल्यानंतर मंजीतकुमारने झोपेतच कपाळावर गॅस सिलेंडर मारल्याची त्याने माहिती दिली. सर्वांनी मंजीतकुमारचा शोध घेतला. मात्र तो पसार झाला होता. शिवाय कामगारांची नावे आणि पत्ता लिहिलेली वही तसेच अजित याचा मोबाईल देखील त्याठिकाणी नव्हता. अजितला उपचारासाठी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यु झाला. दुकान मालकाच्या तक्र ारीनंतर उत्तरप्रदेशच्या मंजीतकुमार विरु द्ध नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याच खटल्याची सुनावणी न्यायाधीश तांबे यांच्या न्यायालयात ३१ मार्च रोजी झाली. सर्व बाजू पडताळल्यानंतर खून प्रकरणात जन्मठेप तर मोबाईल चोरीसाठी एक वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. वर्षा चंदने यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक पी. एम भालेराव यांनी केला. पोलिस हवालदार एस. एस. जाधव, कॉन्स्टेबल जी. जी. पाचेगावकर, हवालदार एस. पी. जाधव, पोलीस नाईक एस. एस. म्हात्रे यांनीही या खटल्यासाठी तपास अधिकाऱ्यांना मदत केली.