शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकसोबत मतदान; अनेक ठिकाणी मशीन बंद, मशीन वरील क्रम चुकले मतदारांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:27 IST

ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच नोकरदार वर्गाने यावेळी आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिले. मॉर्निंग वॉक आटोपून किंवा चालताना थेट मतदान केंद्र गाठत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदानाला सुरुवात होताच शहरात लोकशाहीचा उत्साह दिसून आला. ठाणे, घोडबंदर रोड, कळवा आणि मुंब्रा परिसरातील नागरिक रोजच्या सवयीनुसार पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले आणि चालता-चालताच त्यांनी जवळच्या मतदान केंद्रांचा रस्ता धरत मतदानाचा हक्क बजावला. मात्र शहरातील घोडबंदर असेल बाळकुम असेल कोलशेत अगदी नौपाडा भागात देखील अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या मशीनला करंट येण्याच्या मशीनला एरर येण्याच्या तक्रारी आल्या त्यामुळे सकाळी पहिल्या सत्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केलेल्या नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले.ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच नोकरदार वर्गाने यावेळी आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिले. मॉर्निंग वॉक आटोपून किंवा चालताना थेट मतदान केंद्र गाठत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. ‘आरोग्य राखा आणि मतदान करा’ असा संदेश यानिमित्ताने नागरिकांनी कृतीतून दिला.दरम्यान, अनेक सोसायट्यांबाहेर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदार सहाय्य बूथ उभारले होते. या ठिकाणी छोट्या प्रिंटिंग मशीनद्वारे मतदारांना मतदार पावत्या देण्यात येत होत्या. त्यामुळे या बूथवरही सकाळपासून नागरिकांची गर्दी दिसून आली.मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक अडचण दिसून आली. प्रभाग क्रमांक ३ मधील सेंट झेवियर्स शाळेतील खोली क्रमांक १० आणि १२ येथे मतदानासाठी ठेवलेल्या यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. एका यंत्रात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, तर दुसऱ्या यंत्राला विद्युत प्रवाह जाणवत असल्याचे आढळून आले. या कारणामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. सुमारे अर्ध्या तासानंतर दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आले.ठाण्यातील नौपाडा भागातील सरस्वती विद्यालय मधील मशीन मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली होती. दीड तासापासून मतदार रांगेत उभे असल्याने मतदारांमध्ये संताप, अनेक मतदार मतदान न करता परताना पाहायला मिळाले.याचा फटका मनसे नेते अविनाश जाधव यांना देखील बसला.प्रभाग क्रमांक ८ मध्ये ब्लॉसम शाळा मध्ये 3 ते 4 मशीन मध्ये एरर होता 10 ते 15 मिनिटे उशीर झाला. कोलशेत मध्ये खालचा गाव मनपा शाळा दिड तास उशिराने मतदान सुरू झाले तीन ते चार मशीन मध्ये एरर आले होते, लोढा, यशस्वी नगर, बाळकुम मध्ये देखील असा प्रकार घडला. प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिरीयल नंबर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले होते मनोरमा नगर मध्ये ज्ञानपीठ विद्यालय मध्ये हा प्रकार झाला होता अ ब क ड क्रम चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला होता. त्यामुळे मतदान 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू झाले.काजूवाडी येथे बोगस मतदार पकडला आहे. मतदार मतदान करण्यासाठी गेला असता त्याच्या नावाने आधीच त्याचे मतदान झाले होते. प्रभाग 14 मध्ये, आर जे ठाकूर ला 2 मशीन बंद झाल्या होत्या, 1 तास बंद होते, लोक मतदान न करता परत गेले. ६४९ उमेदवार निवडणूक रिंगणात -ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १६ लाख ४९ हजार ८६९ मतदार आहेत. यामध्ये ८ लाख ६३ हजार ८७८ पुरुष, ७ लाख ८५ हजार ८३० महिला आणि १५९ इतर मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी ९ प्रभागांमध्ये ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये कार्यरत आहेत. एकूण ११०७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत ९९ अर्ज बाद झाले, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत २६९ उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी, अंतिम टप्प्यात ६४९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये शिंदे सेनेचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Morning Walk with Voting Disrupted by Machine Errors in Thane

Web Summary : Thane voters combined morning walks with voting, but faced disruptions. Machine errors and incorrect serial numbers caused delays and frustration. Some voters left without casting ballots due to the issues.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६thaneठाणेVotingमतदान