उल्हासनगर महापालिकेची मतदार जनजागृती शोभायात्रा
By सदानंद नाईक | Updated: April 15, 2024 19:35 IST2024-04-15T19:34:50+5:302024-04-15T19:35:30+5:30
उल्हासनगर महापालिका व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच यांच्यावतीने मताधिकार शोभायात्रेचे आयोजन केले होते.

उल्हासनगर महापालिकेची मतदार जनजागृती शोभायात्रा
उल्हासनगर : नागरिकांत मताधिकार बाबत जनजागृती करण्यासाठीं महापालिका ते चोपडा कोर्ट डॉ आंबेडकर पुतळा दरम्यान शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी शोभा यात्रेत मार्गदर्शन केले आहे.
उल्हासनगर महापालिका व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच यांच्यावतीने मताधिकार शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेत उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ स्वीप टीम तसेच दिव्यांग व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी सक्रिय सहभाग घेतला. या शोभायात्रेची थीम मताधिकार अशी होती. शोभायात्रेत मतदार जनजागृती देखाव्याचे बॅनर्स, स्लोगन फलक आणि मतदार जनजागृती गीत लावून मतदार जनजागृती करण्यात आली. शोभायात्रा संविधान चौक, कल्याण-मुरबाड रोड, चोपडा कोर्ट जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान काढण्यात आली. शोभायात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाली होते. समारोपाच्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त अजीज शेख यांनीही मतदार जनजागृती केली.