शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

कलचाचणीबाबत गांभीर्य आवश्यक, विवेक पंडित यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:10 IST

विद्यार्थ्यांचा करिअरकडील कल जाणून घेण्यासाठी कलचाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, कोणती शाखा निवडावी, यासाठी त्याचा फायदा होतो.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - विद्यार्थ्यांचा करिअरकडील कल जाणून घेण्यासाठी कलचाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, कोणती शाखा निवडावी, यासाठी त्याचा फायदा होतो. मात्र, कलचाचणीच्या निष्कर्षाकडे ५० टक्के पालक आणि विद्यार्थी दुर्लक्ष करतात. पारंपरिक पद्धतीनेच करिअरनिवडीकडे त्यांचा कल आहे. त्यामुळे कलचाचणीबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सजगता आणि गांभीर्य वाढणे आवश्यक आहे, असे मत विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले.पंडित म्हणाले की, करिअरचे अनेक पर्याय आहेत; मात्र माहितीअभावी पालक आणि विद्यार्थी त्याबाबत द्विधा मन:स्थितीत असतात. त्यामुळे परिस्थितीजन्य कारणाअभावी कित्येकदा आवड आणि अभिक्षमता नसणाऱ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी प्रवेश घेत असल्याने त्यांना भविष्यात चाचपडावे लागते. विद्यार्थ्यांमधील वेगळेपण जाणण्यासाठी महाराष्ट्रातील दहावीच्या राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी दरवर्षी घेण्यात येते. यंदाच्या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांमधील अभिक्षमता ओळखता येण्यासाठी अभिक्षमताचाचणीही घेतली जात आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आवडीचे क्षेत्र, त्यासाठी आवश्यक क्षमता या मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे जाणून घेतली जात आहे. मंडळातर्फे राबवला जाणारा हा चांगला उपक्रम असला, तरीही पालक आणि विद्यार्थी त्यांनी ठरवलेले करिअरच निवडतात, असेही त्यांनी सांगितले.नव्याने विकसित केलेल्या या कलचाचणीत कृषी, कला, वाणिज्य, ललित कला, आरोग्य, विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रांमधील अभिरुचीचे मापन केले जाते. ही एक चांगली बाब आहे. आता कलचाचणी ही सर्वसमावेशक बनवली आहे. त्यामुळे पारंपरिक करिअरच्या वाटा सोडून विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्रनिवडीला प्रोत्साहन मिळणार असल्याचे पंडित म्हणाले.नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गगरे म्हणाल्या की, राज्य मंडळाने विद्यार्थ्यांसाठी करिअरनिवडीसाठी एक चांगली संधी दिली आहे. पण, विद्यार्थी त्यात विचार करत नाही. विद्यार्थ्यांनी विचार करून पर्याय निवडले पाहिजेत. कलचाचणीसाठी दीड तास वेळ दिला आहे. विचारपूर्वक उत्तरे ते निवडू शकतात, पण बºयाचदा ते तसे करत नाहीत. बोर्डाचा निकाल येण्यापूर्वी कलचाचणीचा निकाल विद्यार्थ्यांच्या हाती येतो. यंदा कलचाचणीच्या अ‍ॅपवर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुटीत हे व्हिडीओ पाहता येतील. समुपदेशकांकडून मार्गदर्शनही घेता येईल.यंदा विविध क्षेत्रांची माहिती : सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक वीरेंद्र पाटील म्हणाले की, कलचाचणीनुसार ३० ते ३५ टक्के विद्यार्थीच करिअर निवडतात. आजपर्यंतच्या कलचाचण्या फार गांभीर्याने घेतल्या नाहीत. यंदाच्या वर्षी विविध क्षेत्रांची माहिती दिली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना करिअर म्हणजे काय, हे नीट समजत नव्हते. विविध क्षेत्रांची माहिती दिली जात नव्हती. यंदा विविध पर्याय दिल्याने या वर्षापासून विद्यार्थी व पालकांचा कल वाढू शकतो. कलचाचणीच्या निकालानुसार ते करिअर निवडतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र