शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

विठूच्या गजराने दुमदुमली कल्याण-डोंबिवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 2:39 AM

विठ्ठलाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, दिंडी आदी धार्मिक कार्यक्रम सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त कल्याण-डोंबिवलीत पार पडले.

डोंबिवली : विठ्ठलाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, दिंडी आदी धार्मिक कार्यक्रम सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त कल्याण-डोंबिवलीत पार पडले. शहरांतील विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.हरि ओम रेल्वे प्रवासी भजनमंडळ, दिवा-डोंबिवली यांच्यातर्फे डोंबिवली स्थानकातील प्लॅटफार्म नं. १ वर आषाढी एकादशी सोहळा रंगला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहाटे ५.३० वाजता विठ्ठलाचे पूजन केले. तुळशीमाळांनी मूर्तीची सजावट करण्यात आली. भजनाचे स्वर स्टेशन परिसरात घुमले. स्थानकात आलेल्या प्रवाशांनीही विठ्ठलाचे दर्शन घेतले.गणेश मंदिर तसेच संत नामदेव पथावरील विठ्ठल मंदिरातही विठू माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गणेश मंदिरात नारायणाचा अवतार म्हणून मंदिरातील विठ्ठल मूर्तीची पुरुषसुक्त मंत्रांनी पंचामृती पूजा करण्यात आली. निलेश सावंत यांनी विठ्ठलाची पूजा केली. तर, गद्रेबुवा यांचे कीर्तन झाले.निळजे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शीतल पाटील व प्रिती कांबळे यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. प्रथमेश कांबळे यांनी त्यांना साथ दिली. भारत विकास परिषदेने ७५० तुळशीच्या रोपांचे वाटप केले. आयरे रोड येथील विठ्ठल मंदिरात भक्तांनी माऊलीचे दर्शन घेतले.भोपर गावात धर्मा चॅरिटेबल ट्रस्ट व जे. के. पाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. त्यात सहभागी झालेल्या २५० विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी जागृती केली. शाळेचे संचालक गजानन पाटील यांनी ही संकल्पना रुजवली आहे. झाड लावून संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्याला अधिक १० गुण दिले जाणार आहेत.मंदिराच्या प्रांगणात दिंडी स्थिरावल्यावर तेथे विद्यार्थ्यांनी फुगड्यांचा फेर धरला. तर, मारुती मंदिराजवळ विद्यार्थ्यांनी विठूनामाचा जयघोष केला. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताबाई, बहिणाबाई, जनाबाई, नामदेव आदींच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह ग्रामस्थांना आवरला नाही.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली