शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे शहर पोलिसांनी केली साडे तीन हजार वाहने जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: April 20, 2020 23:25 IST

संचारबंदीच्या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 एप्रिलपर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 779 जणांना अटक करण्यात आली. त्यांची तीन हजार 356 वाहने जप्त केली आहेत. विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे 25 लाख 84 हजाराचा दंड वसूलउल्हासनगर परिमंडळामध्ये सर्वाधिक 550 वाहने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे कोरोनाच्या रुगांच्या संख्येत वाढ होत असतांना दुसरीकडे ठाणे शहर पोलिसांनीही विनाकारण फिरणा-यांवर कारवाईचा फास आवळण्यास जोरदार सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 एप्रिलपर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाºया 779 जणांना अटक करण्यात आली. त्यांची तीन हजार 356 वाहने जप्त केली आहेत. अशा विनाकारण वाहन घेऊन फिरणा-यांकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.संचारबंदी लागू झाल्यापासून 25 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील 35 पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर विशेष पथके तैनात केली आहेत. ठाण्यातील राबोडी, मुंब्रा आणि कळवा तसेच भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरच्या काही भागांमध्ये राज्य राखीव दलाच्या तुकडयाही तैनात केल्या आहेत. ठाण्यात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन करणाºयांची 550 वाहने जप्त केली. यामध्ये 298 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये रिक्षा, मोटारसायकल आणि कार आदी वाहनांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या विविध पथकांनी 228 वाहनांवर कारवाई करु न 10 गुन्हे दाखल केले. कल्याणमध्ये उपायुक्त व्ही. एम. पानसरे यांच्या विविध पथकांनी 390 वाहने जप्त करीत 245 जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली. उल्हासनगर परिमंडळामध्ये सर्वाधिक म्हणजे 641 वाहनांवर जप्तीची कारवाई उपायुक्त पी. पी. शेवाळे यांच्या पथकांनी केली. याठिकाणी १७ गुन्हे दाखल झाले आहेत. तर वागळे इस्टेट परिमंडळामध्ये पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली 516 वाहन चालकांवर कारवाई केली. याठिकाणी २०९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. संचारबंदीच्या काळात विनाकारण वाहने घेऊन फिरणाºयांची तीन हजार 356 वाहने जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 779 जणांविरु द्ध कलम 188 तसेच मोटार वाहतूक कायद्यानुसार कारवाई केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.-------वाहतूक पोलिसांनी केला 25 लाखाचा दंड वसूलठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 युनिटच्या वाहतूक पथकांनी विनाकारण फिरणा-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. वाहतूक शाखेनेही आतापर्यंत एक हजार 25 वाहने जप्त केली. त्यांच्याकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल केला आहे. जप्त केलेली वाहने संचारबंदी शिथिल झाल्यानंतरच संबंधित चालकांना परत केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस