शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

२७ गावांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना गावबंदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 4:03 AM

२७ गावांतील प्रश्न सोडवण्याकडे कानाडोळा करणाºया खासदार, आमदारांना गावबंदी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे. यापूर्वीही असाच इशारा समितीने दिला होता.

डोंबिवली - २७ गावांतील प्रश्न सोडवण्याकडे कानाडोळा करणाºया खासदार, आमदारांना गावबंदी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे. यापूर्वीही असाच इशारा समितीने दिला होता.संघर्ष समितीची बैठक शनिवारी हॉरिझॉन सभागृहात सायंकाळी पार पडली. या बैठकीला समितीचे गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, गणेश म्हात्रे, बळीराम तरे, गजानन मांगरूळकर, दत्ता वझे आणि भास्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. २७ गावे महापालिकेतून वेगळे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलेले नाही. आधी नगरपालिका करा, मगच कल्याण ग्रोथ सेंटर उभारा, असा इशारा समितीच्या वतीने यापूर्वीच दिला होता. मात्र, भाजपा सरकारला आधी ग्रोथ सेंटर उभारण्याची घाई झालेली आहे. हे ग्रोथ सेंटर नेमके कोणाच्या फायद्याचे आहे, असा सवाल समितीच्या वतीने उपस्थित केला आहे.ग्रोथ सेंटर हे टीपीएस (टाउन प्लानिंग स्कीम) धर्तीवर विकसित केले जाणार आहे. त्यात ज्यांची जमीन विकासासाठी घेतली जाणार आहे, त्यांना ८० टक्के जमीन विकसित करून द्यायची मागणी बाधितांनी केली होती. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. ५० टक्केच जमीन विकसित करून देण्यात येईल, असे विचाराधीन आहे, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दाट लोकवस्तीची गावे कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये घेण्यात आलेली नाही. एक हजार ८९ हेक्टर जागेवर ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे. त्यापैकी ८४७ हेक्टर जागा ही ग्रोथ सेंटरला वापरली जाणार आहे. उर्वरित २४१ हेक्टर जागा ही गावठाणासाठी शिल्लक राहणार आहे. ग्रोथ सेंटर उभारल्यावर विकासकर लागू नये. मात्र, हा कर लागणार आहे. त्यातून बाधितांची सुटका होणार नाही. या विविध मागण्यांचा विचार न करता ग्रोथ सेंंटरचे घोडे पुढे दामटवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.२७ गावांसह अंबरनाथ तालुक्यातील नव्या घरांची नोंदणी ११ महिन्यांपासून बंद आहे. कल्याण तालुक्यात चार महिन्यांपासून नोंदणी बंद आहे. २७ गावांत २००६ पासून एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण होते. या नियोजन प्राधिकरणाने २००६ पासून मे २०१८ पर्यंत केवळ ५१ बांधकामांना बांधकाम करण्याची अधिकृत परवानगी दिलेली आहे. नोंदणी बंद असताना छुप्या पद्धतीने काही लोक नोंदणी करत आहेत, याकडेही समितीने लक्ष वेधले.या विविध प्रश्नांवर आमदार, खासदारांशी पत्रव्यवहार करून मार्ग काढण्यासाठी शेवटचा पर्याय आहे. त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, तर त्यांना गावबंदी केली जाईल.बैठकीनंतर पालकमंत्र्यांशी झाला संवादबैठकीनंतर सर्वपक्षीय समितीने शिवसेना आमदार सुभाष भोईर यांची भेट घेतली. भोईर यांनी समितीच्या पदाधिकाºयांचे बोलणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत करून दिले. लवकरच याविषयी बैठक घेण्याचे आश्वासन शिंदे यांनी पदाधिकाºयांना दिले आहे.दरम्यान, गावातील राजकीय कार्यकर्त्यांनी अमुक एक खासदार व आमदार एका पक्षाचा आहे, म्हणून पुढे येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढल्याचे बोलले जाते.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्याkdmcकल्याण डोंबिवली महापालिका