आयडियल टीचर पुरस्काराने विजय जाधव सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST2021-09-08T04:49:13+5:302021-09-08T04:49:13+5:30

ठाणे : मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा वेळूक येथे पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत विजय जाधव यांना शिक्षकदिनी रोटरी ...

Vijay Jadhav honored with Ideal Teacher Award | आयडियल टीचर पुरस्काराने विजय जाधव सन्मानित

आयडियल टीचर पुरस्काराने विजय जाधव सन्मानित

ठाणे : मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा वेळूक येथे पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत विजय जाधव यांना शिक्षकदिनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली या संस्थेने नेशन बिल्डर फॉर आयडियल टीचर पुरस्कार गौरविले.

शाळेची पटसंख्या वाढवणे, विद्यार्थ्यांना समाज सहभागातून भौतिक व शैक्षणिक सुविधा मिळवून देणे, कोरोना काळात प्रभावी ऑफलाइन शिक्षण दिले, कला व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, स्वच्छ सुंदर शाळा परिसर या शैक्षणिक कामातून त्यांनी वेळूक शाळा प्रगतिपथावर आणली आहे. या कार्याची नोंद घेऊन त्यांना या मानाच्या पुरस्काने रविवारी सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या अध्यक्षा उल्का सावला, सचिव गिरीश पोफळे आदी रोटरीचे पदाधिकारी याप्रसंगी हजर होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख किशोर भोईर, काशिनाथ शेलवले,

उल्हास घोलप, कास्ट्राइब शिक्षक संघटना अध्यक्ष आनंद सोनकांबळे, डॉ. मिलिंद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: Vijay Jadhav honored with Ideal Teacher Award