शेव उत्पादक मालकांच्या सतर्कतेने अखेर काळाबाजाराला चाप; मात्र दुधाचे भाव गगनाला
By नितीन पंडित | Updated: April 18, 2023 19:16 IST2023-04-18T19:16:06+5:302023-04-18T19:16:20+5:30
शेव उत्पादक मालकांच्या सतर्कतेने अखेर काळाबाजाराला चाप बसला आहे.

शेव उत्पादक मालकांच्या सतर्कतेने अखेर काळाबाजाराला चाप; मात्र दुधाचे भाव गगनाला
भिवंडी : सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांच्या घरी दूध व शेव बनवली जात असते मात्र रमजानच्या सणात या सेवेत सेवेचा काळाबाजार झाल्याची घटना मागील काही दिवसांपासून समोर आली आहे.१०० ते १२० रुपये किलो असणारी शेव तब्बल साडेतीनशे ते चारशे रुपये किलो झाली होती. शेवेची अचानक वाढलेल्या किंमतीमुळे मुस्लिम बांधवांमध्ये नाराजी पसरली होती. त्यातच या शेवेचा काळाबाजार होत असल्याची बाब शेव उत्पादक मालकांना समजल्यानंतर शेव मालकांनी एकत्र येत हा काळाबाजार शेव उत्पादक कंपन्यांकडून झालेला नसून मधल्या एजंट लोकांनी हा भाव वाढवला असल्याची माहिती दिली आहे.
शहरात वाढत्या शेवेचा भाव नियंत्रण आणण्यासाठी आता शेव उत्पादकांनी स्वतःच शेवेची विक्री सुरू केली असून काळा बाजारात विकली जाणारी शेवेला व शेवेचा काळाबाजार करणाऱ्यांना त्यामुळे चाप बसला आहे. दरम्यान भिवंडीत दुधाचे भाव ८४ रुपये प्रति लिटर झाला असून वाढत्या दुधाच्या भावाने देखील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुरडं सहन करावा लागत आहे.