शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
4
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
5
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
6
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
7
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
8
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
9
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
10
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
11
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
12
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
13
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
14
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
15
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
16
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
17
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
18
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
19
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
20
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी

मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 20:08 IST

विद्यार्थी इतके दिवस एक आशेची भावना मनात ठेवून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत होते.

कल्याण : अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने युजीसीच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे परीक्षा घेण्याचा निकाल लागला. या निकालावर विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी कल्याणच्या तहसीलदार ऑफिसला भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र दिले. निर्णय जर सात दिवसात रद्द करण्याचा वटहुकूम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढला नाही, तर विद्यार्थी भारती तीव्र आंदोलन करेल, असे राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले.

विद्यार्थी भारतीकडून अनेक इमेल पाठवून, रक्ताच्या ठस्याचे पत्र पाठवून, ट्विट करून ,आंदोलने करून ,उपोषण करून, मोदींची पहाटे चार वाजता काकड आरती करून, भजन करून ,कीर्तन करून, यूजीसीची प्रेतयात्रा काढून, बोंबा मारो आंदोलन करूनही या सरकारने काहीही सकारात्मक प्रतिसाद न देता  विद्यार्थ्यांच्या जीवावर टांगती तलवार ठेवली.  वारंवार तारखांवर तारखाच दिल्या, असे म्हणणे धुरी यांनी मांडले. विद्यार्थी इतके दिवस एक आशेची भावना मनात ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत होते. ज्याची भीती होती, अखेर तेच झाले. अनेक विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले आईवडील गमावले आहेत. बेरोजगारीमुळे अन्न धान्याचाही तुटवडा आहे. अशावेळी विद्यार्थी कोणत्या मानसिकतेने परीक्षा देतील. हा साधा माणुसकीचा प्रश्न युजीसी ला का पडला नसावा,   असे विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा मुधाने यांनी सांगितले.

मागील अनेक महिने विद्यार्थी भारती संघटना कोरोना काळात सर्वत्र महामारी पसरली असताना अंतिम सत्राच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना मृत्यूच्या सापळ्यात अडकवले जाऊ नये म्हणून प्राण पणाला लावून लढत आहे.  यापुढेही लढणार असे विद्यार्थी भारती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षाStudentविद्यार्थीdombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस