शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

ठाणे-पालघरमध्ये मनसेची परीक्षा, समस्यांचा अभ्यास सुरू, राज ठाकरेंच्या सभा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 7:23 PM

'लाव रे तो व्हिडीओ'मुळे राज यांची चांगलीच चर्चा झाली होती.

- अजित मांडके

ठाणे : लोकसभा निवडणुकीतून माघार घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात १०० ठिकाणी मनसेकडून उमेदवार दिले जाणार असल्याची शक्यता आहे. यामधील २४ उमेदवार हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील असणार आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये थोडा का असेना जोश निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदींसह पालघरमध्ये सभा होणार आहेत. यावेळी ते भाजपच्या विरोधात पुन्हा डरकाळी फोडणार आहेत. याशिवाय, विधानसभेच्या या कठीण परीक्षेत किती टक्के गुण मिळणार, याचाही अभ्यास मनसे करणार आहे.

लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढता केवळ 'लाव रे तो व्हिडीओ'मुळे राज यांची चांगलीच चर्चा झाली होती. परंतु, त्यानंतर विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबतही अनेक तर्क-विर्तक लावले जात होते. परंतु, आता मनसेने १०० जागा लढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ठाणे आणि पालघरमधील सर्वच जागांवर म्हणजेच २४ जागांवर उमेदवार देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती मनसेच्या सुत्रांनी दिली आहे. त्यासाठी प्रचाराचाही अजेंडा जवळजवळ निश्चित झाला आहे. यामध्ये रस्ते, वीज, पाणी आदींसह मूलभूत सोयीसुविधांची वाणवा याची पोलखोल केली जाणार आहे. ठाण्यातील चार मतदारसंघातूनही अशाच प्रकारे प्रचार केला जाणार असून मनसे सत्तेत आल्यास विकासाची हमी सुद्धा दिली जाणार आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यासह, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि पालघर आदी भागात राज ठाकरे आपल्या खास 'ठाकरी' शैलीत सत्ताधारी भाजपचा समाचार घेणार आहेत.  तसेच, 'मोदींची पोलखोल' हा कार्यक्रम या निमित्ताने प्रमुख अजेंडा असणार असल्याची माहिती मनसेच्या सुत्रांनी दिली आहे. 

या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेला मानणारा किंबहुना मराठी मतांचा टक्का किती साथ देणार याचाही अभ्यास केला जाणाप आहे. लोकसभा निवडणूक न लढल्यामुळे मनसेला कुठे किती मते मिळू शकतात, मनसेच्या मतांचा फटका कोणाला बसणार? हे चित्र स्पष्ट होऊ शकले नव्हते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत या सर्वांचीच उत्तरे किंबहुना विधानसभेच्या या परिक्षेत किती टक्के गुण मिळणार हे स्वत: मनसेला आणि इतर पक्षांना समजणार आहे. याच निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या जोरावर मनसेचा महापालिकेचा फॉर्म्युलाही निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणेpalgharपालघर