ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध दंतवैद्य र. म. शेजवलकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 21:31 IST2025-08-04T21:30:29+5:302025-08-04T21:31:48+5:30

ठाणे शहरातील भास्कर कॉलनी परिसरात ते त्यांच्या  परिवारासह वास्तव्य होते. गेले ४० हून अधिक वर्ष त्यांनी दंतवैद्य ची प्रॅक्टिस केली.

Veteran writer R. M. Shejwalkar passes away | ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध दंतवैद्य र. म. शेजवलकर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध दंतवैद्य र. म. शेजवलकर यांचे निधन

ठाणे : ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिक, सुप्रसिद्ध दंतवैद्य डॉ. र. म. शेजवलकर यांचे सायंकाळी (४ ऑगस्ट) पावणेपाच वाजता दुःखद निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. परंतु आज त्यांची या दुर्धर आजाराने प्राणज्योत मालवली. 

डॉक्टर शेजवलकर हे ठाण्यातील नामवंत साहित्यांपैकी एक साहित्यिक. त्यांचे वाचन अफाट होते शेवटपर्यंत त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. आकाशवाणीवर गाजलेले पुन्हा प्रपंच या मालिकेतील काही भागांचे तसेच, दूरदर्शनवरील गजरा कार्यक्रमाच्या काही भागांचे लेखन केले होते. 

त्यांची काही पुस्तके, कविताप्रसिद्ध झाल्या होत्या. वाचनात आगळेवेगळे व माझी दंतकथा याचे कार्यक्रम ते करीत असत. ते मूळचे ठाण्याचे रहिवासी होते. ठाण्यातील सुप्रसिद्ध अभिनय कट्ट्यावर ते कधी प्रमुख पाहुणे म्हणून तर कधी श्रोता म्हणून आवर्जून उपस्थित असत. 

अभिनय कट्ट्याचे संस्थापक किरण नाकती यांच्यासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ठाणे शहरातील भास्कर कॉलनी परिसरात ते त्यांच्या  परिवारासह वास्तव्य होते. गेले ४० हून अधिक वर्ष त्यांनी दंतवैद्य ची प्रॅक्टिस केली आणि ५० हून अधिक वर्ष त्यांनी लेखन केले. 

गावदेवी मैदानातील बेडेकर हॉस्पिटल आवारात त्यांचा दवाखाना होता. अनेक दिग्गजांनी त्यांच्याकडून वैद्यकीय सेवा घेतली आहे. सुप्रसिद्ध नाटककार मामा पेंडसे यांचे लेखनिक म्हणून त्यांनी काम.केले होते. अनेक दिग्गज व्यक्ती, साहित्यिक आणि नाटककारांशी ते जोडले होते. 

अनेक एकांकिका , नाटिका त्यांनी लिहिल्या होत्या. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनीता, मुलगा डॉ. पुष्कर  सून डॉ. पल्लवी,, नातू असा परिवार आहे. रात्री ९.३० वाजता त्यांच्यावर जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

Web Title: Veteran writer R. M. Shejwalkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.