वेढे ग्रामपंचायत ठरली तालुकास्तरावर सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST2021-08-14T04:45:47+5:302021-08-14T04:45:47+5:30

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वेढे ग्रामपंचायतीला ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे. शुक्रवारी भिवंडी ग्रामीणचे आमदार ...

Vedhe Gram Panchayat became the best in the taluka | वेढे ग्रामपंचायत ठरली तालुकास्तरावर सर्वोत्कृष्ट

वेढे ग्रामपंचायत ठरली तालुकास्तरावर सर्वोत्कृष्ट

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वेढे ग्रामपंचायतीला ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे. शुक्रवारी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी भिवंडी पंचायत समितीचे सभापती रविकांत पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, आदी उपस्थित होते.

लोकोपयोगी कामांची दखल राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांनी घेतली असून, तालुका स्तरावरील महाआवास योजना पुरस्कार २०२०-२१ सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून वेढे ग्रामपंचायतीला द्वितीय व तृतीय क्रमांकाचे दोन पुरस्कार मिळाले आहेत. भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वेढे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विलास पाटील व उपसरपंच संजय पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Web Title: Vedhe Gram Panchayat became the best in the taluka