निवडणूक उमेदवारांसाठी वडापाव १३ रुपये, मिसळ ३० रुपये आणि पावभाजी ७० रुपयासह विविध दर निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 22:22 IST2024-04-18T22:21:30+5:302024-04-18T22:22:25+5:30
ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी राजकीय पक्षांसाठीचे खर्चाचे मानक दरपत्रक आज निश्चित केले आहे

निवडणूक उमेदवारांसाठी वडापाव १३ रुपये, मिसळ ३० रुपये आणि पावभाजी ७० रुपयासह विविध दर निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी राजकीय पक्षांसाठीचे खर्चाचे मानक दरपत्रक आज निश्चित केले आहे यामध्ये एक वडापाव १३ रुपये,मिसळपाव ३० लपये पावभाजी ७० रुपये आदी खानपान च्या ६७ पदार्थ,चहा, काँपी आदी पेय मिळून ६७ पदार्थांचे दर आज घोषित केले.
वाहने, एका पुलाची किंमत ३ रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंतचे पुष्पहार, मंठप, खुर्चीदर, बँडबाजा आदींचे दरपत्रक निश्चित केले आहेत. या निवडणूक उमेदवारांसाठी विविध प्रकारांची दरअंतिम करून आज रात्री उशिरापर्यंत जाहीर केले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाना व निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाबाबत विविध बाबींचे दर निश्चित केले आहेत.
यामध्ये वाहन भाडे दर, जाहिरात प्रसिद्धीचे दर, खानपान सेवेचे दर, बुके/पुष्पगुच्छ, मंडप, टेबल खुर्ची, लाऊडस्पिकर, पंखे इ., स्टेशनरी, सीसीटीव्ही, व्हिडिओ इ., मनुष्यबळ पुरवठा, संगणक व इतर साहित्य, झेंडे/बॅनर/फ्लेक्स, व्हिआयपीवरील खर्च, बँड/बँजो, फटाके इत्यादींचे दरपत्रक जिल्हा निवडणूक कार्यालयाने ठरविले आहेत. वृत्तपत्र जाहिराती, दूरचित्रवाणी व केबलचे दर हे शासनाने ठरविल्याप्रमाणे असणार आहेत, असे यासंबंधीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.