शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

‘वारी’ हे तर विद्यापीठ

By जान्हवी मोर्ये | Published: July 22, 2018 12:08 AM

वारकऱ्यांचे अनुभव; नेतृत्वाविना स्वयंशिस्तीचे दर्शन

डोंबिवली : ज्येष्ठ महिना सरत आला की, वारकºयांना वेध लागतात ते विठुमाऊलीच्या दर्शनाचे. पंढरीचा वास, चंद्रभागेचे स्नान आणि विठोबाच्या दर्शनाची आस वारकºयांना ओढून नेते. वारीतील शिस्त वाखाणण्याजोगी असून वारी म्हणजे एक विद्यापीठच आहे. जे आम्हा सर्वांना खूप काही शिकवून जाते. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारी करावी, असे मनोगत डोंबिवलीतील अलका कोकजे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.कोकजे यांना वारीविषयी उत्सुकता होती. मात्र, त्यांना सोबत मिळत नसल्याने सहभागी होता येत नव्हते. अनेक वर्षांची त्यांची वारी करण्याची इच्छा यंदा पूर्ण झाली. देवकी मानकामे यांची साथ त्यांना मिळाली. पुण्याहून त्यांनी आळंदी गाठले. आळंदीहून पालखीसोबत ३० किमी चालून एक दिवसाचा मुक्काम केला. त्यानंतर, पुणे ते सासवड ३५ किमीचे अंतर पार केले.लाखो वारकरी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने चालतात. कोणतेही नेतृत्व नसताना स्वयंशिस्तीने वारकरी पालखीबरोबर लयबद्ध पावले टाकत चालत असतात. अभंग-भजने गात, फुगड्या घालत दिंड्या पुढे सरकत होत्या. वारी ज्या मार्गाने जाते, त्या वाटेवरील गावांतील लोक माऊलीच्या दर्शनासाठी तासन्तास ताटकळलेले पाहिले की, मन भरून येते. वारकºयांना चहा, नाश्ता, फळे, पाणी, लाडू, जेवण यांची प्रत्येक गावागावांतून सोय केलेली असते.चप्पल दुरुस्त करून देणे, मोफत बॅग दुरुस्त करून देणे, औषधे पुरवणे याचीही काळजी घेतली जाते. पोलीस आपली जबाबदारी चोख बजावतात. वस्तीला राहणाºया वारकºयांना ओट्यावर झोपायला देणे, अंघोळीला पाणीही दिले जाते, असे मानकामे म्हणाल्या.एकोप्याची शिकवणनामस्मरणाचा हा सामुदायिक गजर देशाला खूप मोठी सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळवून देत आहे. वारीत कुणी लहानमोठा नसतो. सगळे सारखे, एकमेकांना मदतीचा हात देणारे, काळजी घेणारे असतात. वारकºयांचा हा एकोपा पाहिला की, खरेच असे वाटते की, प्रत्येकाने एकतरी वारी अनुभवावी, असे कोकजे म्हणाल्या.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरSolapurसोलापूर