शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

व्हॅलेंटाइन डे : ठाण्यात ४८ जोडप्यांनी साधला विवाह मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 2:18 AM

प्रेमात आकंठ बुडालेली प्रेमीयुगुले जीवनसाथी होण्यासाठी व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिवसाचा मुहूर्त साधतात. गुरुवारी व्हॅलेंटाइन डे निमित्ताने ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात ४८ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

ठाणे : प्रेमात आकंठ बुडालेली प्रेमीयुगुले जीवनसाथी होण्यासाठी व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिवसाचा मुहूर्त साधतात. गुरुवारी व्हॅलेंटाइन डे निमित्ताने ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात ४८ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या जोडप्यांत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या ३५ आहे, हे उल्लेखनीय.प्रेम म्हणजे प्रेम असते. तुमचे आमचे सेम असते, ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता किंवा कुसुमाग्रजांची प्रेम कुणावरही करावे, ही कविता आजही व्हॅलेंटाइन डे ला सोशल मीडियावर फिरत असली, तरी आजही आंतरजातीय प्रेम करणाºयांना विरोध केला जातो. व्हॅलेंटाइन डेला ठाण्याच्या विवाह नोंदणी कार्यालयात विवाहबद्ध ३५ जोडप्यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या वर्षी व्हॅलेंटाइन डे ला विवाह नोंदणी कार्यालयात २२ आंतरजातीय विवाह झाले होते. त्यात यंदाच्या वर्षी १३ ने वाढ झाली आहे.आगाऊ सूचना देऊन व्हॅलेंटाइन डे ला विवाह करणाºयांची संख्या १३ होती. गतवर्षी आगाऊ सूचना देऊन विवाह करणाºयांची संख्या २३ होती. त्यात यंदाच्या वर्षी घट झाली आहे. मात्र, अनेकांनी ‘चट मंगनी, पट ब्याह’ या पद्धतीने व्हॅलेंटाइन डे चा मुहूर्त साधला आहे. ज्यांना इच्छा असूनही व्हॅलेंटाइन डे चा मुहूर्त साधता आला नाही, ते येत्या तीन दिवसांत नोंदणी पद्धतीने विवाह करतात. नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा कल वाढतोय, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे, अशी माहिती ठाणे विवाह नोंदणी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक जी.आर. पवार यांनी दिली.

टॅग्स :marriageलग्न