उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैदूला चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST2021-07-14T04:44:46+5:302021-07-14T04:44:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड - कावीळ झाल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैदूला तिच्या पतीने चांगलाच चोप दिला. ...

Vaidu was beaten for molesting a woman who came for treatment | उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैदूला चोपले

उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैदूला चोपले

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड - कावीळ झाल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैदूला तिच्या पतीने चांगलाच चोप दिला. पुन्हा असे करणार नाही, अशी गयावया करणाऱ्या वैदूविरोधात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पीडित महिला ही २२ वर्षांची असून आपल्या पतीसह राहते. तिची प्रकृती ठीक नसल्याने कावीळची लागण झाल्याचा संशय होता. त्याअनुषंगाने ८ जुलै रोजी ती भाईंदर पूर्व फाटक मार्गावरील अन्वर इमारतीतील कावीळवर उपचार करणाऱ्या असलम शेख या वैदूकडे गेली होती. चाचणीनंतर तिला कावीळ झाल्याचे निष्पन्न झाले. १० जुलै रोजी सायंकाळी ती उपचारासाठी असलम शेखकडे गेली, त्यावेळी शेख याने तिच्याशी बळजबरी अश्लील चाळे सुरू केले. माझ्याशी मैत्री करशील का, असे तो विचारू लागला. त्यावर पीडित महिलेने त्याला धक्का देऊन तेथून स्वतःची सुटका करून घेतली व घडला प्रकार पतीला सांगितला. उपचाराच्या आड विनयभंग करणाऱ्या वैदूला पीडितेच्या संतप्त पतीने चोप दिला. पीडितेच्या विनयभंग केल्याच्या फिर्यादीनंतर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वैदू शेख याला बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: Vaidu was beaten for molesting a woman who came for treatment