खासगी रुग्णालयांत लसीकरणाचे विविध दर, ७०० ते १२०० रुपयांना मिळते लस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 07:31 AM2021-05-09T07:31:13+5:302021-05-09T07:32:06+5:30

काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वत्र लसीकरणासाठी गर्दी होत आहे; परंतु आता ही गर्दी येत्या काही दिवसांत कमी होण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. खासगी रुग्णालयांनादेखील आता पुन्हा लस उपलब्ध होऊ लागली आहे.

Vaccination rates in private hospitals Rs. 700 to Rs. 1,200 | खासगी रुग्णालयांत लसीकरणाचे विविध दर, ७०० ते १२०० रुपयांना मिळते लस

खासगी रुग्णालयांत लसीकरणाचे विविध दर, ७०० ते १२०० रुपयांना मिळते लस

Next

ठाणे: एकीकडे लसींचा तुटवडा असताना आता दुसरीकडे काही खासगी रुग्णालयांतून देखील लसीकरण मोहीम सुरू झाली असून त्याचे स्लॉटदेखील फुल्ल होऊ लागले आहेत; परंतु प्रत्येक रुग्णालयात लसीकरणाचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून आले आहे. कोविशिल्डसाठी कुठे ७०० ते कुठे ९०० रुपये आकराले जात आहेत. तर कोव्हॅक्सिनसाठी थेट १२०० रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. (Vaccination rates in private hospitals Rs. 700 to Rs. 1,200)


काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वत्र लसीकरणासाठी गर्दी होत आहे; परंतु आता ही गर्दी येत्या काही दिवसांत कमी होण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. खासगी रुग्णालयांनादेखील आता पुन्हा लस उपलब्ध होऊ लागली आहे. शनिवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील रुग्णालयातून लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग सुरू झाल्याचे दिसत होते; परंतु खासगी रुग्णालयांनी लसींचे दर आता वेगवेगळे आकारण्याचे निश्चित केल्याचे दिसत आहे. काही रुग्णालयात कोविशिल्डची लस ही ७०० रुपयांना तर काही ठिकाणी ७५०, ८५० तर काही ठिकाणी ९०० रुपये आकारले जात आहेत; परंतु शासकीय केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी खासगी रुग्णालयातील स्लॉट बुक केल्याचे दिसत आहे. कोव्हॅक्सिनसाठी तर १,२०० रुपये आकारले जाणार आहेत.

लस कशी घ्यायची?
- खासगी रुग्णालयांकडून विविध दर निश्चित करण्यात येत असल्याने लस कशी घ्यायची, असा पेच नागरिकांना पडला आहे; परंतु ज्याला परवडेल त्यांनी घ्यावी असेही आता सांगितले जात आहे. 

- यापूर्वी खासगी रुग्णालयात कोविशिल्डची लस २५० रुपयांना मिळत होती; परंतु आता ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांना दुसऱ्या डोससाठी ७०० ते ९०० रुपये मोजावे लागणार आहेत, तर ज्यांनी पहिलाही डोस अद्याप घेतलेला नाही, त्यांच्यासाठी जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हे दर समान ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
 

Web Title: Vaccination rates in private hospitals Rs. 700 to Rs. 1,200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app