ठाण्यातील मतदारसंघात उत्तर प्रदेशचे निरीक्षक दाखल, हिंदी भाषिकांकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:16 AM2019-10-03T01:16:23+5:302019-10-03T01:16:54+5:30

ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपने समसमान जागा घेतल्या आहेत. परंतु, भाजपच्या ज्याज्या मतदारसंघात उत्तर भारतीय बांधव वास्तव्य करून आहेत.

Uttar Pradesh observer in constituencies, Hindi speakers pay attention to constituencies | ठाण्यातील मतदारसंघात उत्तर प्रदेशचे निरीक्षक दाखल, हिंदी भाषिकांकडे लक्ष

ठाण्यातील मतदारसंघात उत्तर प्रदेशचे निरीक्षक दाखल, हिंदी भाषिकांकडे लक्ष

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपने समसमान जागा घेतल्या आहेत. परंतु, भाजपच्या ज्याज्या मतदारसंघात उत्तर भारतीय बांधव वास्तव्य करून आहेत. त्यांची मते मिळविण्यासाठी भाजपने थेट उत्तर प्रदेशमधील पदाधिकाऱ्यांना पाचारण केले असून तेच या जिल्ह्यातील भाजपच्या मतदारसंघात प्रभारी व निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

जिल्ह्यात आता इतर भाषिकांचाही टक्का वाढला आहे. ठाणे असो किंवा डोंबिवली किंवा जिल्ह्याचा ग्रामीण भाग या सर्वच ठिकाणी परप्रांतीय मतदारांचा टक्का हा वाढलेला आहे. पूर्वी हा मतदार फारसा महत्त्वाचा मानला जात नव्हता. मात्र, आता त्यालाही मागील काही वर्षांत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे हा टक्का आपल्याकडे खेचण्यासाठी आता भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याने भाजपलाच मतदान करावे, हे समजावण्यासाठीच पक्षाने उत्तर प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची टीमच जिल्ह्यात दाखल केली आहे. उत्तर प्रदेशचे महत्त्वाचे पदाधिकारी जिल्ह्यात ज्याज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत. त्यात्या ठिकाणी प्रभारी आणि निरीक्षक म्हणून काम करणार आहेत. यासाठी काही स्थानिक परप्रांतीय पदाधिकाºयांची मदत घेऊन हे निरीक्षक या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करणार आहेत. त्यानुसार, ठाणे शहरात अरुण कुमार सिंह हे उत्तर प्रदेश भाजपचे कार्यकारी सदस्य सध्या ठाण्याच्या परप्रांतीयांची वस्ती असलेल्या भागात सक्रिय झाले असून या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करीत आहेत.

अगोदरच केला अभ्यास
मराठी, गुजराथी, मुस्लिम आदींसह इतर भाषिकांची मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे कोणत्या मतदारसंघात कोणत्या भाषिक मतदारांचा टक्का अधिक आहे, याचा अभ्यासही यापूर्वीच भाजपच्या केंद्रीय पातळीवरील समितीने केला आहे. त्या अनुषगांने आता प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलचे काम सुरूकेले आहे.

Web Title: Uttar Pradesh observer in constituencies, Hindi speakers pay attention to constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.