शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

विनापरवाना रिव्हॉल्व्हरमधून झाला ठाण्यातील ‘तो’ गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 05:11 IST

शस्त्रक्रिया करून काढली पोटातील गोळी : अनवधानाने गोळीबार झाल्याचा आरोपीचा दावा

ठाणे : किसननगर येथील एका गोदामामध्ये बसलेल्या अक्षय पवार याच्या हातून गावठी रिव्हॉल्व्हरमधून झालेला गोळीबार हा रिव्हॉल्व्हर हाताळताना नजरचुकीने झाल्याचा दावा त्याने श्रीनगर पोलिसांकडे केला आहे. त्याच्याकडे या रिव्हॉल्व्हरचा परवाना नसून त्याने ती कोणाकडून आणली, या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत. तर, गोळीबारात जखमी झालेल्या विजय यादव (२०) याच्यावर वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून यशस्वीरीत्या गोळी काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अक्षय (रा. शिवशक्ती निवास, किसननगर, ठाणे), विजय आणि अवधेश यादव असे तिघे मित्र किसननगर येथील इस्टेट एजंट ऋषिकेश माने यांच्या गोदामामध्ये १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा.च्या सुमारास बसले होते. त्याचवेळी अक्षयने आपल्याकडे एक रिव्हॉल्व्हर असल्याचे विजयला सांगितले. ती खोटी असावी, या शक्यतेने रिव्हॉल्व्हर बघण्याची उत्सुकता विजयनेही दाखवली. ती आपल्या मित्रांना दाखवताना निष्काळजीपणे हाताळल्यामुळे अक्षयच्या हातून गोळीबार झाल्याने विजयच्या पोटाला गोळी लागली. अक्षयने तातडीने त्याला वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रिव्हॉल्व्हर हाताळताना हा प्रकार घडल्याचा दावा अक्षयने पोलिसांकडे केला. तशीच माहिती विजय आणि अवधेश यांनीही दिली.पण, विनापरवाना त्याने ते हाताळले. शिवाय, पोलीस आयुक्तांचा मनाई आदेशाचा भंग करून ते स्वत:कडे बाळगले. त्याने ते कोणाकडून आणले, याची मात्र त्याच्याकडून योग्य माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ते कचऱ्यात मिळाल्याचा दावा त्याने केला आहे. ते कचºयात मिळाले होते, तर त्याने ते पोलीस ठाण्यात जमा का केले नाही? किंवा याची त्याने पोलिसांना रीतसर माहिती का दिली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी विजयचा चुलत भाऊ संदीप यादव याने मंगळवारी रात्री ११ वा.च्या सुमारास तक्रार दाखल केली.घटनास्थळाला पोलिसांची भेट; आरोपीला कोठडीच् पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर यांच्या पथकाने अक्षयला अटक केली. त्याला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.च्घटनास्थळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, निरीक्षक सुनील पंधरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. उपनिरीक्षक दिनेश चव्हाण तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी