केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भिवंडीत भव्य बाईक रॅली

By नितीन पंडित | Updated: August 13, 2023 16:15 IST2023-08-13T16:15:04+5:302023-08-13T16:15:19+5:30

या रॅलीबरोबर भारतमाता व स्वातंत्र्यवीरांच्या जयजयकाराच्या घोषणांमुळे वातावरण तिरंगामय झाले होते.

Union Minister Kapil Patil's grand bike rally in Bhiwandi | केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भिवंडीत भव्य बाईक रॅली

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भिवंडीत भव्य बाईक रॅली

भिवंडी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्ताने भाजपातर्फे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी काढलेल्या भव्य बाईक रॅलीमुळे भिवंडीतील ग्रामीण परिसर तिरंगामय झाला होता. या रॅलीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांसह शेकडो तरुणांनीही सहभाग घेतला.

या रॅलीबरोबर भारतमाता व स्वातंत्र्यवीरांच्या जयजयकाराच्या घोषणांमुळे वातावरण तिरंगामय झाले होते. कशेळी टोलनाका ते काल्हेरपर्यंत हि रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, जयवंत पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Union Minister Kapil Patil's grand bike rally in Bhiwandi