भिवंडीत क्रिकेट खेळणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
By नितीन पंडित | Updated: November 15, 2023 16:27 IST2023-11-15T16:26:42+5:302023-11-15T16:27:13+5:30
दिवाळी निमित्त कोनगावातील बॉक्स क्रिकेट ग्राउंडवर गावातील युवकांसह गणेश क्रिकेट खेळण्यासाठी मंगळवारी रात्री गेला होता.

भिवंडीत क्रिकेट खेळणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
भिवंडी : क्रिकेट खेळताना अस्वस्थ वाटू लागल्याने कोनगावातील तरुणाचा उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणेश रामदास पाटील (वय २७) असे मृत युवकाचे नाव आहे.
दिवाळी निमित्त कोनगावातील बॉक्स क्रिकेट ग्राउंडवर गावातील युवकांसह गणेश क्रिकेट खेळण्यासाठी मंगळवारी रात्री गेला होता. त्यावेळी खेळत असताना गणेश यास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास थेट उपचारा साठी खासगी रुग्णालयात नेले असता तेथे उपचारा दरम्यान युवकाचा मृत्यू झाला आहे. मृत गणेश याचा आठ दिवसापूर्वी ऐरोलीत साखरपुडा झाला होता. ऐन दिवाळीत युवकाच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.