साडी वाटपाचा बहाणा करीत दागिने लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:13 IST2020-12-09T19:12:32+5:302020-12-09T19:13:57+5:30
साडी वाटपाचा बहाणा करीत गोकुळनगर येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेच्या ८५ हजारांच्या २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगडया लुबाडल्याची घटना ठाण्यातील जांभळी नाका येथे घडली.

ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार
ठळक मुद्देठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : साडी वाटपाचा बहाणा करीत गोकुळनगर येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेच्या ८५ हजारांच्या २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगडया लुबाडल्याची घटना ७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जांभळी नाका येथे घडली. तीन अनोळखी भामटयांनी तिला हातातील बांगडया पाकिटात ठेवायला सांगितल्या. तिने त्या पिशवीत ठेवल्यानंतर त्यांनी हात चलाखीने करुन बांगडया आणि सातशे रुपयांची रोकड फसवणूकीने लुबाडली. याप्रकरणी तिने ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.