शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

भिवंडीच्या कशेळी - काल्हेरमधील एमएमआरडीएच्या जागेवरील अनिधकृत ७५ निवासी इमारती सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 8:09 PM

या कारवाई दरमयान विशेषत: कांदळवन असलेल्या ठिकाणी झालेल्या बांधकामांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वेळी सील केलेल्या इमारतींच्या विकासकांवर संध्याकाही उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम होते

ठळक मुद्देठाणे जिल्हाधिका-यांची धडक कारवाईकारवाई झालेल्या इमारतींचे पंचनामे सुरूकुठल्याही स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती

ठाणे : कशेळी व काल्हेर परिसरातील एमएमआरडीएच्या जमिनीवरील ७५ निवासी इमारती अनधिकृत असल्याचे उघड झाले. यामुळे अनधिकृत इमारती तातडीने सील करण्याची धडक कारवाई ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा प्रशासनाने केली. यासाठी स्वत: जिल्हाधिका-यांनी महसूल अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस फौजफाटा घेऊन ही कारवाई केली.या कारवाई दरमयान विशेषत: कांदळवन असलेल्या ठिकाणी झालेल्या बांधकामांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वेळी सील केलेल्या इमारतींच्या विकासकांवर संध्याकाळी  उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम होते. ‘पर्यावरण संरक्षणाला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. विशेषत: कशेळी, काल्हेर येथील कांदळवनाचा नाश करून बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. एमएमआरडीए जमिनीवर देखील अतिक्रमणे झाल्याच्या तक्रसरींची दाखल घेऊन हे पाउल उचलले’ असे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.आज कारवाई झालेल्या इमारतींचे पंचनामे सुरू आहेत. नव्या शर्तीच्या जागेवर झालेल्या या बांधकामांसाठी ग्रामपंचायत, पालिका किंवा कुठल्याही स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती. या इमारतींपैकी काही पूर्ण झालेल्या निवासी इमारती असून काही इमारतीं अपूर्णावस्थेत असल्याचे प्रांत अधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी सांगितिले. या अपूर्ण इमारतींचा पंचनामा करण्यात येत आहे. त्यांची कागदपत्रे रीतसर तपासून मग त्या जमीनदोस्त करण्याची कारवाई होईल. ज्या इमारती बांधून पूर्ण आहेत, त्या शासन जमा होतील. सध्या भिवंडी पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. या इमारतींमध्ये कुणीही रहात नव्हते, त्यापैकी काही बांधून तयार होत होत्या, तत्पुर्वी ही कारवाई हाती घेण्यात आल्याची माहिती डॉ. थिटे यांनी माहिती दिली. आज दुपारपासूनच ही कारवाई सुरु झाली. यावेळी पोलीस उपायुक्त पोलीस फौजफाट्यासह उपस्थित होते. याशिवाय उपजिल्हाधिकारी त्याचप्रमाणे तहसीलदार शशिकांत गायकवाड, नायब तहसीलदार संदीप आवारी तसेच त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार