उल्हासनगर - सन १९८७ ते १९९६ दरम्यान हंगामी सफाई कामगारा म्हणून काम केलेल्या पैकी २७ जणांना औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने मंगळवारी नियुक्तीपत्रे दिली. कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत समावून घेतल्याची माहिती कामगार नेते दिलीप थोरात यांच्यासह अन्य नेत्यांनी देऊन आयुक्त मनिषा आव्हाळे यांचे आभार व्यक्त केले.
उल्हासनगर महापालिकेत सन १९८७ ते १९९६ दरम्यान हंगामी सफाई कामगार म्हणून काम केलेल्या सफाई कामगारांनी एकत्र येत महापालिकेच्या सेवेत कायम स्वरुपात सामावुन घेणेसाठी औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. औद्योगिक न्यायालयाने महापालिकेत रिक्त असलेल्या ३०५ सफाई कर्मचाऱ्याच्या जागी सेवाजेष्ठनेनुसार २७ कर्मचाऱ्याना कामावर हजर करुन घेण्याबाबत महापालिकेला निर्देश दिले. तसेच इतर पात्र कर्मचाऱ्या बाबत महापालिका आयुक्त निर्णय घेणार आहे. निवड प्रकिया नियमानुसार पार पाडुन, सेवा प्रवेश नियमानुसार वय व शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतानुसार प्राधान्य देऊन, त्यांना २५ जानेवारी २०१० नियुक्ती देण्यात आली.
उल्हासनगर महापालिका सेवेत सफाई कामगार या पदावर आदेशाच्या दिनांकापासुन खालील अटी व शर्तीच्या अधिन राहुन भुतलक्षीप्रभावाने रुजु करण्यात आले आहे. तसेच २७ पैकी ८ जणांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम १०(५) (टिप २) न्वये त्यांच्या नावासमोर नमुद करून वयोमानानुसार बळीराम धोंडु राव, विठ्ठल रामभाजी बोराडे, अंबादास गंगाराम मोटे, अशोक तानाजी बोरगे, नवनाथ नारायन गाडे, अर्जुन गोविंद साळवे, रमेश विठ्ठल रणदिवे, साहेबराव भाऊ गायकवाड यांना सेवानिवृत्त करून त्यांच्या वारसदारांना कामावर घेण्यात येणार आहे. तर २७ पैकी इतर १९ सफाई कामगार महापालिका सेवेत रुजू झाले. कामगारांच्या नियुक्तीसाठी सर्वच कामगार संघटनेने एकत्र येत पाठपुरावा केला होता.